399 चा रिचार्ज करा आणि 3300 रुपये मिळवा, जिओची ऑफर

जिओने नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी खास ऑफर दिली आहे.

399 चा रिचार्ज करा आणि 3300 रुपये मिळवा, जिओची ऑफर

मुंबई : जिओने नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी खास ऑफर दिली आहे. 399 या लोकप्रिय ऑफरच्या रिचार्जवर 3300 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. यापूर्वीही जिओने दोन ऑफर आणल्या होत्या. यामध्ये अनलिमिटेड डेटाचा समावेश होता. त्यानंतर आता ही आणखी एक ऑफर आणली आहे.

कॅशबॅक कसा मिळेल?

  • 400 रुपयांचे मायजिओ कॅशबॅक व्हाऊचर्स मिळतील

  • 300 रुपयांचा इंस्टंट कॅशबॅक माबाईल वॉलेटमधून रिचार्ज करण्यासाठी मिळेल

  • 2600 रुपयांचा कॅशबॅक ऑनलाईन शॉपिंगसाठी मिळेल


हॅप्पी न्यू ईयर ऑफर

रिलायन्स जिओ नव्या वर्षीत ग्राहकांना गिफ्ट देण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने हॅप्पी न्यू ईयर प्लॅन 2018 ची घोषणा केली आहे. याअंतर्गत कंपनीने दोन नवे प्लॅन आणले आहेत.

हॅप्पी न्यू ईयर प्लॅन 2018 मध्ये 199 रुपये आणि 299 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. हॅप्पी न्यू ईयर प्लॅन 2018 जास्त डेटाची गरज असणाऱ्या ग्राहकांसाठी आहे. जिओच्या प्राईम मेंबर्सनाच केवळ या प्लॅन्सचा लाभ घेता येईल.

199 रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओच्या ग्राहकांना दररोज 1.2 GB डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. त्यामुळे ग्राहकांना दररोज 1.2GB डेटा वापरता येईल.

यापेक्षाही जास्त डेटा लागत असेल तर 299 रुपयांचा प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा मिळणार आहे. शिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि मेसेज मिळणार आहेत. 28 दिवसांसाठी याची व्हॅलिडिटी असेल.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: get 3300 rupees cashback on 399 recharge jio offers
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV