तब्बल 5000mAh क्षमतेची बॅटरी, जिओनीचा नवा फोन लाँच

हा फोन सप्टेंबर महिन्यातच चीनमध्ये लाँच करण्यात आला होता.

तब्बल 5000mAh क्षमतेची बॅटरी, जिओनीचा नवा फोन लाँच

नवी दिल्ली : जिओनीचा एम 7 पॉवर हा जबरदस्त स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. 5000mAh क्षमतेची बॅटरी आणि 6 इंच आकाराची स्क्रीन ही या फोनची सर्वात मोठी वैशिष्ट्य आहेत. हा फोन सप्टेंबर महिन्यातच चीनमध्ये लाँच करण्यात आला होता.

जिओनी एम 7 पॉवरची किंमत भारतात 16 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. अमेझॉनवर 25 नोव्हेंबरपासून या फोनची विक्री सुरु होईल. या फोनच्या खरेदीसोबतच अनेक लाँचिंग ऑफर्सही देण्यात येणार आहेत. जिओकडून 100GB अतिरिक्त डेटा देण्यात येईल.

जिओनी एम 7 पॉवरचे फीचर्स

  • अँड्रॉईड 7.1.1 नॉगट

  • 6 इंच आकाराची एचडी स्क्रीन

  • 1.4GHz ऑक्टा कोअर स्नॅपड्रॅगन 435 प्रोसेसर

  • 4GB रॅम, 64GB इंटर्नल स्टोरेज

  • 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

  • 5000mAh क्षमतेची बॅटरी

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: gionee m7 power launched in India price and launching offers
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: gionee m7 power एम 7 पॉवर जिओनी
First Published:
LiveTV