गुगलचं एक भन्नाट अॅप, सुंदर पिचाईंकडून घोषणा!

By: | Last Updated: > Friday, 19 May 2017 6:16 PM
Google CEO Sundar Pichai has announced a new feature called Google Lens latest update

मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एका नव्या गुगल अॅपची घोषणा केली आहे. ‘गुगल लेन्स’ असं या अॅपचं नाव असून हे अॅप अतिशय भन्नाट आहे. या अॅपमुळे मोबाइलच्या कॅमेऱ्याची व्याख्याच पूर्णपणे बदलली जाणार आहे.

 

या अॅपमध्ये कम्प्युटर व्हिजन आणि आर्टिफिशियल इंटेडलिजेंस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. म्हणजेच तुमच्या स्मार्टफोन कॅमेऱ्यामध्ये AI तंत्रज्ञान येणार आहे.

 

उदा. एखाद्या फोटोबाबत तुम्हाला काही माहिती हवी असेल तर गुगल लेन्स वापरा. गुगल लेन्स सुरु करताच तुम्ही काढलेला फोटो स्कॅन होईल आणि त्या फोटोसंबंधी सर्व माहिती एका क्षणात तुमच्या मोबाइल स्क्रिनवर दिसेल.  त्यामुळे तुमच्या मोबाइलचा कॅमेरा आता फक्त कॅमेरा राहणार नाही. तर तुम्हालरा फोटो कशासंबंधी आहे याचीही माहिती देईल. असा कंपनीचा दावा आहे.

 

समजा, तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटचा फोटो स्कॅन केला तर तुम्हाला पुढच्या काही वेळात त्याबाबत संपूर्ण माहिती मिळेल.

 
गुगल लेन्स अॅप हे गुगल अॅसिस्टेंटसोबतही वापरता येणार आहे. अॅसिस्टेंट अॅपमध्ये नव्यानं दिलेल्या ऑप्शन सिलेक्ट करुन यूजर बोलताना देखील लेन्स अॅक्टिव्हेट करु शकतो. त्यामुळे बातचीत सुरु असताना देखील एखाद्या फोटोबाबत जाणून घ्यायचं असेल तर यूजर्स संबंधित फोटो स्कॅन करुन त्याबाबत माहिती मिळवू शकतो.

 
एवढंच नाही तर, गुगल अॅसिस्टेंटच्या साथीनं गुगल लेन्स यूजर्सला भाषांतर करण्यासही मदत करेल.

 

 

Technology News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Google CEO Sundar Pichai has announced a new feature called Google Lens latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

BSNL च्या 2 हजार मॉडेमवर मालवेअर हल्ला
BSNL च्या 2 हजार मॉडेमवर मालवेअर हल्ला

नवी दिल्ली : बीएसएनएल या सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनीने

2040पासून ब्रिटनमध्ये पेट्रोल, डिझेल आणि हायब्रिड कारच्या विक्रीवर बंदी
2040पासून ब्रिटनमध्ये पेट्रोल, डिझेल आणि हायब्रिड कारच्या विक्रीवर...

इंग्लंड : वायू प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे

दिवसाला तब्बल 3जीबी 4G डेटा, Airtelचा नवा प्लॅन 
दिवसाला तब्बल 3जीबी 4G डेटा, Airtelचा नवा प्लॅन 

मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलनं एक नवा डेटा टेरिफ

अमेझॉनचा संस्थापक जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती!
अमेझॉनचा संस्थापक जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती!

  मुंबई: जगातील सर्वात मोठी ऑनलाईन शॉपिंग कंपनीअमेझॉन इंकच्या

व्हॉट्सअॅपचं लवकरच आणखी एक अॅप लॉन्च होणार
व्हॉट्सअॅपचं लवकरच आणखी एक अॅप लॉन्च होणार

मुंबई : सोशल मीडियात महत्त्वाचं अॅप मानलं जाणारं व्हॉट्सअॅप लवकरच

जीएसटीनंतर स्मार्टफोन विक्रीवर काय फरक पडला?
जीएसटीनंतर स्मार्टफोन विक्रीवर काय फरक पडला?

लंडन : भारतात दरवर्षी मोबाइल फोनच्या मागणीत प्रचंड वाढ होत असल्याचं

नोकिया 8 च्या लाँचिंगचा मुहूर्त अखेर ठरला!
नोकिया 8 च्या लाँचिंगचा मुहूर्त अखेर ठरला!

नवी दिल्ली : एचएमडी ग्लोबलकडून नोकिया 8 हा स्मार्टफोन 16 ऑगस्ट रोजी

तब्बल 6GB रॅम, मोटोचा नवा हायटेक फीचर्स फोन लाँच
तब्बल 6GB रॅम, मोटोचा नवा हायटेक फीचर्स फोन लाँच

नवी दिल्ली : मोटोरोलाचा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन मोटो Z2 फोर्स लाँच

4G स्पीडमध्ये एअरटेल नंबर वन, जिओ शेवटच्या स्थानी : ओपनसिग्नल
4G स्पीडमध्ये एअरटेल नंबर वन, जिओ शेवटच्या स्थानी : ओपनसिग्नल

मुंबई : इंटरनेट स्पीडची तपासणी करणारी फर्म ओपनसिग्नलनं एअरटेल

Yu Yunique 2  स्मार्टफोन लाँच, किंमत 5,999 रुपये
Yu Yunique 2 स्मार्टफोन लाँच, किंमत 5,999 रुपये

मुंबई : YU टेलिवेंचर आणि मायक्रोमॅक्सनं YU युनिक 2 हा स्मार्टफोन लाँच