‘मल्लिका ए गझल’ बेगम अख्तर यांना गुगलचा डूडलद्वारे सलाम

‘ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया.’ यासारख्या अजरामर गझल देणाऱ्या बेगम अख्तर यांची आज 103 वी जयंती आहे.

By: | Last Updated: > Saturday, 7 October 2017 8:37 AM
Google Doodle celebrates Indian singer of Ghazal Begum Akhtar’s 103rd birth anniversary

मुंबई: ‘मल्लिका ए गझल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेगम अख्तर यांना जयंती दिनी गुगलने डूडलद्वारे सलामी दिली आहे.

‘ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया.’, ‘मेरे हम नफस, मरे नवा, मुझे दोस्त बन के दगा न दे’ यासारख्या अजरामर गझल देणाऱ्या बेगम अख्तर यांची आज 103 वी जयंती आहे. त्याच निमित्ताने गुगलने भारताच्या या गजलसम्राज्ञीचं डूडल बनवलं आहे.

बेगम अख्तर यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1914 रोजी झाला. गझल, दादरा आणि ठुमरी या भारतीय संगीतात त्यांचा हातखंडा होता.

आपल्या गाण्यांनी केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं. पाकिस्तानमध्येही त्यांचे अनेक चाहते आहेत.

बेगम अख्तर यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. याशिवाय त्यांनी संगीत क्षेत्रातील मानाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कारही पटकावला होता.

बेगम अख्तर यांनी पहिल्यांदा कोलकाता इथं स्टेजवर आपलं गाणं सादर केलं होतं. बिहारच्या भूकंप  पीडितांसाठी हा कार्यक्रम होता.

बेगम अख्तर यांच्या टॉप टेन गझल

1. ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया : गझल, (शकील बदायुंनी) (ऐकण्यासाठी क्लिक करा)

2. उल्टी हो गयी सब तदबीरें : गझल, (मीर तकी मीर) (ऐकण्यासाठी क्लिक करा)

3. जिक्र उस परीवश का : गझल, (मिर्ज़ा ग़ालिब) (ऐकण्यासाठी क्लिक करा)

4. कुछ तो दुनिया की इनायात ने दिल तोड़ दिया : गझल (सुदर्शन फाकिर) (ऐकण्यासाठी क्लिक करा)

5. अहले उल्फ़त के हवालों पे हँसी आती है : गझल (सुदर्शन फाकिर) (ऐकण्यासाठी क्लिक करा)

6. वो जो हम में तुम में करार था : गझल (मोमिन) (ऐकण्यासाठी क्लिक करा)

7. शाम-ए-फिराक अब न पूछ : गझल (फैजअहमद फैज) (ऐकण्यासाठी क्लिक करा)

8. इतना तो जिंदगी में किसी की खलल पडे : गझल (कैफी आजमी) (ऐकण्यासाठी क्लिक करा)

9. जिंदगी का दर्द लेकर इंकलाब आया तो क्या : गझल (शकील बदायुंनी) (ऐकण्यासाठी क्लिक करा)

10. दीवाना बनाना है तो दीवाना बना दे : गझल (बेहजाद लखनवी) (ऐकण्यासाठी क्लिक करा)

Art And Literature News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Google Doodle celebrates Indian singer of Ghazal Begum Akhtar’s 103rd birth anniversary
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

1208 पुस्तकं लिहिणारे गुरुनाथ नाईक आर्थिक विवंचनेत!
1208 पुस्तकं लिहिणारे गुरुनाथ नाईक आर्थिक विवंचनेत!

गोवा : तब्बल 1208 पुस्तके लिहून मराठी साहित्यविश्वात अमूल्य योगदान

91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं ठिकाण ठरलं!
91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं ठिकाण ठरलं!

नागपूर : 91 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा बुलडाण्यात होणार

पंढरपुरात ‘रिंगण’ विशेषांकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
पंढरपुरात ‘रिंगण’ विशेषांकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

पंढरपूर : संतपरंपरेचा मागोवा घेणाऱ्या ‘रिंगण’ या विशेषांकाचं

2 फाईव्ह स्टार हॉटेल, 1 हेलिकॉप्टर, जस्टिन बिबरच्या मागण्यांची यादी
2 फाईव्ह स्टार हॉटेल, 1 हेलिकॉप्टर, जस्टिन बिबरच्या मागण्यांची यादी

मुंबई: इंटरनॅशनल पॉप सिंगर जस्टिन बिबर एका भव्य म्युझिक

प्रसिद्ध विनोदी लेखक तारक मेहता यांचं निधन
प्रसिद्ध विनोदी लेखक तारक मेहता यांचं निधन

अहमदाबाद : प्रसिद्ध विनोदी लेखक तारक मेहता यांचं दीर्घ आजाराने निधन

VIDEO : ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये प्रेग्नंट बियोन्सच्या परफॉर्मन्सने सगळेच अवाक्
VIDEO : ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये प्रेग्नंट बियोन्सच्या परफॉर्मन्सने...

लॉस एन्जेलिस : अमेरिकन पॉपस्टार बियोन्सला बेस्ट अर्बन कन्टेम्पररी

भारतीय तबलावादक संदीप दास यांना प्रतिष्ठेचा 'ग्रॅमी पुरस्कार'
भारतीय तबलावादक संदीप दास यांना प्रतिष्ठेचा 'ग्रॅमी पुरस्कार'

लॉस अँजेलिस : भारतीय तबलावादक संदीप दास यांचा ग्रॅमी पुरस्काराने

‘रि-इन्व्हेंट महाराष्ट्र’चा शानदार शुभारंभ
‘रि-इन्व्हेंट महाराष्ट्र’चा शानदार शुभारंभ

मुंबई : महाराष्ट्रातील लघू-मध्यम उद्योग आणि सूक्ष्म-लघू-मध्यम

शिवसेना-भाजप युतीसंदर्भातील सर्व अपडेट एकाच ठिकाणी
शिवसेना-भाजप युतीसंदर्भातील सर्व अपडेट एकाच ठिकाणी

मुंबई : आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी

'लास्ट ख्रिसमस' गाणाऱ्या पॉपस्टार जॉर्ज मायकलचं ख्रिसमसलाच निधन
'लास्ट ख्रिसमस' गाणाऱ्या पॉपस्टार जॉर्ज मायकलचं ख्रिसमसलाच निधन

लंडन : ज्याने ‘लास्ट ख्रिसमस’ म्हणत अवघ्या पॉप जगतावर अधिराज्य