कुणा व्यक्तीसाठी नव्हे, तर 'होल पंचर'साठी गूगलचं डूडल

गूगलने लोगोला रंगबेरंगी रुप देऊन, स्पेलिंगमधील दुसऱ्या 'जी'ला पानाचं स्वरुप दिलं आहे आणि होल पंचर त्या पानाला पंच करताना दाखवत जीआयएफ फाईल केली आहे. अत्यंत आकर्षक असं डूडल गूगलने केले आहे.

कुणा व्यक्तीसाठी नव्हे, तर 'होल पंचर'साठी गूगलचं डूडल

मुंबई : नेहमीच दिग्गज व्यक्तींना आपल्या डूडलद्वारे सलामी देणाऱ्या गूगलने आज एका मशिनला सलामी दिली आहे. पंचिंग मशिन अर्थात 'होल पंचर'च्या शोधाला 131 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गूगलने खास डूडल तयार केले आहे.

गूगलने लोगोला रंगबेरंगी रुप देऊन, स्पेलिंगमधील दुसऱ्या 'जी'ला पानाचं स्वरुप दिलं आहे आणि होल पंचर त्या पानाला पंच करताना दाखवत जीआयएफ फाईल केली आहे. अत्यंत आकर्षक असं डूडल गूगलने केले आहे.

जर्मन शास्त्रज्ञ फ्रेडरिक सिओनेकन यांनी 14 नोव्हेंबर 1886 रोजी होल पंचरचचं पेटंट मिळवलं. याच फ्रेडरिक सिओनेकन यांनी ब्लाईंडर आणि कॅलिग्राफीसाठी वापरण्यात येणाऱ्या इंक पेनसाठीच्या स्पेशल निबचाही शोध लावला होता.

ISO 838 असलेलं होल पंचर आजही जगभरात वापरलं जातं. अभ्यास, ऑफिस कामांसाठी होल पंचर अत्यावश्यक असतं.

सध्याचं युग डिजिटल युग आहे. सगळेजण कम्प्युटर, लॅपटॉप, आयपॅड इत्यादींचा वापर करतात. मात्र आजही होल पंचरचा वापर कमी झालेला नाही. जिथे कागदपत्रांचा संबंध येतो, तिथे होल पंचर असतंच असतं.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Google pays tribute to Hole puncher through Doodle latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV