गुगल पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL आज लाँच होणार

गुगलचे दोन नवे फोन पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL आज लाँच होणार आहेत. या फोनचे वेगवेगळे लीक रिपोर्ट्स लाँचिंगपूर्वी समोर आले आहेत.

गुगल पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL आज लाँच होणार

मुंबई : गुगल आज पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL हे हायटेक फीचर्स स्मार्टफोन लाँच करणार आहे. गुगलने एचटीसीसोबत हे स्मार्टफोन तयार केले आहेत. फीचर्स पाहता हा फोन अॅपलला टक्कर देण्याची शक्यता आहे.

पिक्सेल 2 स्पेसिफिकेशन

या स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वी विविध लीक रिपोर्ट समोर आले. त्यानुसार, या फोनमध्ये 5 इंच आकाराची एचडी स्क्रीन आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 836 प्रोसेसर असेल, असाही दावा करण्यात आला आहे. शिवाय 64GB आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट लाँच केले जातील, असं बोललं जात आहे.

पिक्सेल 2 मध्ये ऑटो फोकस फीचर्ससह 12 मेगापिक्सेलचा सिंगल रिअर कॅमेरा असू शकतो. तर 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असेल.

पिक्सेल 2 XL स्पेसिफिकेशन

या स्मार्टफोनच्याही लाँचिंगपूर्वी विविध लीक रिपोर्ट समोर आले. त्यानुसार, या फोनमध्ये 6 इंच आकाराची एचडी स्क्रीन आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 836 प्रोसेसर असेल, असाही दावा करण्यात आला आहे. शिवाय 64GB आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट लाँच केले जातील. दोन्हीही व्हेरिएंटमध्ये 4GB रॅमे असेल.

पिक्सेल 2 XL मध्ये 12 मेगापिक्सेल सिंगल रिअर कॅमेरा आणि 12 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असेल. रिअर कॅमेऱ्यात फेस डिटेक्शन आणि ऑटो लेझर फोकस हे फीचर्स मिळतील.

दरम्यान दोन्ही फोनच्या बॅटरी बॅकअपविषयी माहिती समोर आलेली नाही. मात्र या फोनमध्ये फास्ट चार्जिंग फीचर असेल, अशी माहिती आहे. तर लेटेस्ट अँड्रॉईड 8.0 ओरिओ सिस्टम देण्यात येणार आहे.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV