गुगलचे हे दोन फोन अॅपलला टक्कर देणार?

4 ऑक्टोबर रोजी गुगल पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL लाँच होणार आहेत.

गुगलचे हे दोन फोन अॅपलला टक्कर देणार?

नवी दिल्ली : गुगल 4 ऑक्टोबरला पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL हे हायटेक फीचर्स स्मार्टफोन लाँच करणार आहे. गुगलने एचटीसीसोबत हे स्मार्टफोन तयार केले आहेत. फीचर्स पाहता हा फोन अॅपलला टक्कर देण्याची शक्यता आहे.

पिक्सेल 2 XL मध्ये 6 इंच आकाराची स्क्रीन देण्यात आली आहे. गुगलचा यापूर्वीचा फोन पिक्सेलमध्ये सिंगल कॅमेरा देण्यात आला होता.   लो लोईट फोटोग्राफीच्या बाबतीत या कॅमेऱ्याने आयफोन 7 लाही मागे सोडलं होतं. सध्या अॅपल आणि सॅमसंगसहित सर्वच कंपन्या ड्युअल रिअर कॅमेरा देत आहेत. मात्र गुगल सिंगल कॅमेरासह डिजीटल झूमचा ऑप्शन देत आहे.

गुगलच्या या फोनमध्ये ओरियो 8.0 ऑपरेटिंग सिस्टम असेल. ही ऑपरेटिंग सिस्टम आतापर्यंत कोणत्याही फोनमध्ये देण्यात आलेली नाही. गुगलचे हे फोन गेमिंग फोन असतील, असंही बोललं जात आहे.

दरम्यान या फोनचे सर्व फीचर उद्या म्हणजे लाँचिंगनंतरच समोर येतील. या फोनची किंमत आणि फीचर्सबाबत सध्या वेगवेगळे रिपोर्ट्स समोर येत आहेत. मात्र कंपनीकडून अधिकृत माहिती लाँचिंग कार्यक्रमातच दिली जाईल.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV