भारताच्या पहिल्या महिला फोटोग्राफर पत्रकाराला गुगलची आदरांजली

भारताच्या पहिल्या महिला फोटोग्राफर पत्रकार होमाई व्यारावाला यांना गुगलने आज डुडलद्वारे आदरांजली वाहिली.

भारताच्या पहिल्या महिला फोटोग्राफर पत्रकाराला गुगलची आदरांजली

मुंबई : भारताच्या पहिल्या महिला फोटोग्राफर पत्रकार होमाई व्यारावाला यांना गुगलने आज डुडलद्वारे आदरांजली वाहिली. होमाई व्यारावाल यांनी स्वतंत्र भारतातील पहिल्या तीन दशकांतील अनेक घटना घडमोडींची क्षणचित्रे आपल्या कॅमेऱ्यात कैद केली होती.

कोण आहेत होमाई व्यारावाला ?

होमाई व्यारावाला यांचा जन्म 9 डिसेंबर 1913 रोजी गुजरातमधील नवसारी येथील एका मध्यमवर्गीय पारशी कुटुंबात झाला. आपल्या मित्राकडून त्यांनी फोटोग्राफी शिकली. 1942 मध्ये दिल्लीत वास्तव्याला आल्यानंतर, त्यांनी पत्रकारितेसाठी फोटोग्राफीला सुरुवात केली.

स्वातंत्र्य लढ्याच्या अखेरच्या पर्वात पंडित नेहरु, महात्मा गांधी यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांची, तसेच, स्वतंत्र भारतातील पहिल्या तीन दशकांतील अनेक महत्त्वाच्या घटना, त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्या.

2012 मध्ये त्यांचं किरकोळ अपघातानंतर रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झालं. त्यांना 2011 मध्ये भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कारनेही गौरवले होते.

आज त्यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त गुगलने, खास डुडलच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: googles doodle pays tribute to Homai Vyarawallas 104 birth anniversary
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV