होंडाने तब्बल 22,834 कार परत मागवल्या!

होंडाने एअरबॅगमधील बिघाडामुळे तब्बल 22,834 कार परत (रिकॉल) मागवल्या आहेत.

होंडाने तब्बल 22,834 कार परत मागवल्या!

मुंबई : होंडाने एअरबॅगमधील बिघाडामुळे तब्बल 22,834 कार परत (रिकॉल) मागवल्या आहेत. यामध्ये 510 होंडा अकॉर्ड कार, 240 जॅज कार आणि 22084 होंडा सिटी कारचा समावेश आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 2013 साली तयार करण्यात आलेल्या अकॉर्ड, जॅज आणि सिटी कारच्या एअरबॅग इंफलेक्टरमध्ये बिघाड असल्याचं म्हटलं  आहे.

honda 2-

इंफलेक्टर खराब झाल्याने अपघातसमयी एअरबॅग उघडण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे चालक आणि गाडीतील लोकांच्या जीवाला धोका पोहचू शकतो. त्यामुळे कंपनीने तब्बल 22834 कार परत मागवल्या आहेत. तुमच्या कारमध्ये ही समस्या आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या गाडीचा आयडेंटी नंबर (व्हीआयएन) कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर टाकावा लागेल. जर तुमच्या कारमध्ये संबंधित बिघाड असेल तर तो मोफत दुरुस्त करुन दिला जाणार आहे. यासाठी कंपनीचे डीलर आपल्या ग्राहकांना यासंबंधी माहिती देत आहेत.

honda 3

मागील वर्षी जानेवारीमध्ये देखील कंपनीने एअरबॅगमधील बिघाडामुळे तब्बल 41,850 कार परत मागवल्या होत्या. यामध्ये जुन्या जनरेशनच्या अकॉर्ड, सिविक आणि जॅज या कारचा समावेश होता.

बातमी सौजन्य : cardekho.com 

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Honda recalled 22834 cars due to faulty airbag latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV