रॉयल एन्फिल्डला टक्कर, होंडा 'बुलेट' बनवणार!

By: | Last Updated: > Monday, 20 March 2017 10:54 AM
Honda to make middleweight motorcycle in India to rival royal enfield

मुंबई : दमदार आणि स्टायलिश बाईक बनवणारी कंपनी रॉयल एन्फिल्डला लवकरच नवा प्रतिस्पर्धी मिळण्याची शक्यता आहे. होंडा आता पॉवरफुल बाईक सेगमेंटमध्ये उतरणार आहे. कंपनीसाठी हा एक प्रयोग आहे, ज्यात थेट रॉयल एन्फिल्ड त्यांची प्रतिस्पर्धी असेल.

आता सीबीआरपेक्षा एक पाऊल पुढे जात होंडा अशी बाईक आणणार आहे, जी दिसायला मोठी असेल, त्यासोबतच पॉवरफुलही असेल. एशियन होंडा मोटर्स कंपनी लिमिटेडचे संचालक नोरिअक आबे यांच्या माहितीनुसार, “कंपनीने या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी नवी टीम स्थापन केली आहे. या टीममध्ये थायलंड आणि जपानच्या निवडक तज्ज्ञांचा समावेश आहे, ज्यांना भारतात येऊन बाईक डिझाईन करण्यास सांगितलं आहे.

“जर कंपनीने भारतात याचं उत्पादन केलं, तर त्यांची जपानमध्येही निर्यात केली जाईल,” असंही नोरिअक आबे यांनी सांगितलं.

होंडाजवळ आधीपासूनच 300-500 सीसीमध्ये दो बाईक (रिबेल 300 आणि रिबेल 500) आहेत. अमेरिकन बाजारात या बाईक मागील अनेक काळापासून वापरात आहेत. आता पॉवरफुल बाईक आणून रॉयल एन्फिल्डला टक्कर कशी देता येईल, यावर कंपनींचं लक्ष आहे.

2016-17 वर्षात रॉयल एन्फिल्डने 5.92 लाख युनिटपेक्षा जास्त विक्री केली. तर 13,819 युनिटची निर्यात केली. मात्र, जाणकारांच्या मते, रॉयल एन्फिल्डला मात देणं होंडासाठी सोपं नसेल. रॉयल एन्फिल्डच्या ‘हिमालयन’ बाईकचे ग्राहक भारतातच नाही तर परदेशातही पसरले आहेत.

Technology News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Honda to make middleweight motorcycle in India to rival royal enfield
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

टाटा टियागो एक्सटीए कार लाँच, किंमत 4.79 लाख
टाटा टियागो एक्सटीए कार लाँच, किंमत 4.79 लाख

मुंबई : टाटानं टियागो कारचं नवं ऑटोमॅटिक व्हेरिएंट एक्सटीए लाँच

मारुती सुझुकीची सियाज एस कार लाँच, किंमत 9.39 लाख
मारुती सुझुकीची सियाज एस कार लाँच, किंमत 9.39 लाख

  मुंबई : मारुती सुझुकीनं सियाज कारचं नवं व्हेरिएंट सियाज एस लाँच

असुसचा 'झेनफोन झूम एस' भारतात लाँच
असुसचा 'झेनफोन झूम एस' भारतात लाँच

मुंबई : असुसने गुरुवारी ‘झेनफोन झूम एस’ हा स्मार्टफोन लाँच केला

दररोज अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग, व्होडाफोनची ऑफर
दररोज अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग, व्होडाफोनची ऑफर

नवी दिल्ली : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने दमदार ऑफर

मोस्ट अवेटेड Nokia 8 स्मार्टफोन लाँच
मोस्ट अवेटेड Nokia 8 स्मार्टफोन लाँच

  मुंबई : HMD ग्लोबलनं काल लंडनमध्ये मोस्ट अवेटेड नोकिया 8 अँड्रॉईड

स्वाईपचा Elite 4G स्मार्टफोन लाँच, किंमत 3,999 रुपये
स्वाईपचा Elite 4G स्मार्टफोन लाँच, किंमत 3,999 रुपये

मुंबई : स्वाईप टेक्नोलॉजीनं काल (बुधवार) स्वस्त 4G स्मार्टफोन ‘Elite 4G’

सावधान! ओप्पो, विवो, शाओमी, जियोनीचा फोन वापरताय?
सावधान! ओप्पो, विवो, शाओमी, जियोनीचा फोन वापरताय?

मुंबई : तुम्ही जर चिनी कंपनीचा मोबाईल वापरत असाल, तर तुमच्यासाठी

रिलायन्स जिओची आणखी एक धमाकेदार ऑफर
रिलायन्स जिओची आणखी एक धमाकेदार ऑफर

मुंबई : रिलायन्स जिओनं आपल्या यूजर्ससाठी पुन्हा एक नवी ऑफर आणली आहे.

हलकी, मजबूत आणि टिकाऊ.... लवकरच लाकडी कार रस्त्यावर
हलकी, मजबूत आणि टिकाऊ.... लवकरच लाकडी कार रस्त्यावर

मुंबई : लाकडी कारसोबत आपण लहाणपणी खेळलो. पण आता याच खेळण्यातल्या

Sarahah अॅपवर आता तुमची ओळख गुप्त राहणार नाही?
Sarahah अॅपवर आता तुमची ओळख गुप्त राहणार नाही?

  मुंबई : सोशल मीडियावर Sarahah या अॅपनं गेल्या काही दिवसांपासून बराच