ऑनर 7x स्मार्टफोन लाँच, किंमत 12,999 रुपये

हुवाई कंपनीन आपला नवा स्मार्टफोन ऑनर 7x लाँच केला आहे. याच्या 32 जीबी व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये तर 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे.

ऑनर 7x स्मार्टफोन लाँच, किंमत 12,999 रुपये

मुंबई : हुवाई कंपनीन आपला नवा स्मार्टफोन ऑनर 7x लाँच केला आहे. याच्या 32 जीबी व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये तर 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. ऑनर 7x भारतात 7 डिसेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. याची विक्री फ्लॅश सेलमधून होईल. जो फक्त ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अमेझॉनवर असणार आहे.

या स्मार्टफोनमध्ये 18:9 अस्पेक्ट रेशिओ एज-टू-एज डिस्प्ले असणार आहे. यामध्ये 5.9 इंट फूल एचडी स्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये 659 ऑक्टा कोअर प्रोसेसर देण्यात आलं आहे. यामध्ये चार जीबी रॅमही देण्यात आली आहे.

या स्मार्टफोनमध्ये ड्यूल कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 16 मेगापिक्सल प्रायमरी 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर कॅमेरा देण्यात आला आहे. तर यात 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेराही आहे.

यात 4G VoLTE,वाय-फाय, ब्ल्यूटूथ v4.1, जीपीएस यासारखे फीचरही देण्यात आली आहे. या स्मार्टफोनच्या रिअर पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आले आहेत.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: honor 7x with launched starting at rs 12999 latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV