'एचटीसी यू'च्या लॉन्चिंगचा मुहूर्त ठरला!

By: | Last Updated: > Friday, 21 April 2017 3:44 PM
'एचटीसी यू'च्या लॉन्चिंगचा मुहूर्त ठरला!

नवी दिल्ली : एचटीसी स्मार्टफोनचा स्वत:चा असा एक यूझर वर्ग आहे. हँडसेटमधील हटके फीचर्समुळे प्रसिद्ध असलेल्या एचटीसीच्या नव्या स्मार्टफोनची उत्सुकता कायमच असते. तशीच उत्सुकता ‘HTC U’ स्मार्टफोनची होती. मात्र, आता उत्सुकता संपली आहे.

‘HTC U’ स्मार्टफोन 16 मे रोजी लॉन्च होणार आहे. या हँडसेटमध्ये हटके फीचर्स असतील, असे संकेत एचटीसी कंपनीकडून देण्यात आले आहेत.

एचटीसीने ट्विटरवर रिलीज केलेलं टीझर पाहिल्यास लक्षात येतं की, एचटीसी यू स्मार्टफोनमध्ये एज सेन्सर असणार आहे.

एचटीसी यू स्मार्टफोन रिलीज व्हायला अजून 20 ते 25 दिवस आहेत. मात्र, आतापासूनच फीचर्सबाबत तर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे. फीचर्स लीक झाल्याच्या नावाखाली अनेक गोष्टी समोर येत आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाचं म्हणजे या स्मार्टफोनच्या पृष्ठभागावर डिस्प्ले फ्रेम सेन्सर असेल. या टच सेन्सिटिव्ह फ्रेमच्या मदतीने यूझर्स व्हॅल्युम कमी-जास्त करु शकतात. शिवाय, अॅप अॅक्सेसही करता येणार आहे. एचटीसी यू हा एकही बटन नसलेला जगातील पहिला स्मार्टफोन असेल, अशीही चर्चा आहे.

काही रिपोर्टनुसार या स्मार्टफोनचे फीचर्स पुढीलप्रमाणे असतील:

– 5.5 इंचाचा स्क्रीन
– क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835 चिपसेट
– 4 जीबी / 6 जीबी रॅम व्हेरिएंट
– 64 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट
– 16 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा
– 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
– 3000 mAh क्षमतेची बॅटरी

First Published:

Related Stories

मोबाइल नंबर आधारकार्डशी लिंक करणं आवश्यक!
मोबाइल नंबर आधारकार्डशी लिंक करणं आवश्यक!

मुंबई: मार्च महिन्यात दूरसंचार मंत्रालयानं टेलिकॉम कंपन्यांना

500 रुपयात तब्बल 100 जीबी डेटा, जिओची लवकरच नवी ऑफर
500 रुपयात तब्बल 100 जीबी डेटा, जिओची लवकरच नवी ऑफर

मुंबई: मोफत मोबईल कॉल्स आणि मोबाईल इंटरनेट देणाऱ्या रिलायन्स

फेसबुकचा भरमसाठ वापर आरोग्यासाठी हानीकारक!
फेसबुकचा भरमसाठ वापर आरोग्यासाठी हानीकारक!

न्यूयॉर्क : प्रत्येक क्षणाला फेसबुक अपडेट पाहणाऱ्यांसाठी ही बातमी

ड्युअल रिअर कॅमेरा, 8GB रॅम, नोकियाचा नवा फोन
ड्युअल रिअर कॅमेरा, 8GB रॅम, नोकियाचा नवा फोन

मुंबई : नोकियाने एचएमडी ग्लोबलसोबत बाजारात कमबॅक केलं आहे. त्यामुळे

अँड्रॉईड डिव्हाईसला Judy मालवेअरचा धोका, 3.6 कोटी यूजर्सला फटका
अँड्रॉईड डिव्हाईसला Judy मालवेअरचा धोका, 3.6 कोटी यूजर्सला फटका

मुंबई: Ransomware व्हायरस गेल्या काही दिवसात बराच धुमाकूळ घातला होता.

जिओनी S10 लॉन्च, चार कॅमेऱ्यांसह जबरदस्त फीचर्स
जिओनी S10 लॉन्च, चार कॅमेऱ्यांसह जबरदस्त फीचर्स

मुंबई : जिओनीने नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन ‘S10’ लॉन्च केला असून,

मोस्ट सक्सेसफुल फोन, तरीही ‘OnePlus 3T’ची भारतातील विक्री बंद?
मोस्ट सक्सेसफुल फोन, तरीही ‘OnePlus 3T’ची भारतातील विक्री बंद?

नवी दिल्ली : वनप्लस कंपनी मोस्ट सक्सेसफुल स्मार्टफोन ‘OnePlus 3T’ची

आयडियाची 4G सेवा लाँच, यूजर्ससाठी खास ऑफर
आयडियाची 4G सेवा लाँच, यूजर्ससाठी खास ऑफर

मुंबई: देशातील तिसऱ्या क्रमांकाची टेलीकॉम कंपनी आयडिया सेल्युलरनं

शाओमीचा Mi Max 2 स्मार्टफोन लाँच, जबरदस्त फीचर्स
शाओमीचा Mi Max 2 स्मार्टफोन लाँच, जबरदस्त फीचर्स

मुंबई: चीनी मोबाइल कंपनी शाओमीनं आज आपला नवा स्मार्टफोन Mi Max 2 लाँच

आता व्होडाफोनचीही अनलिमिटेड कॉलिंग आणि 4G डेटा ऑफर
आता व्होडाफोनचीही अनलिमिटेड कॉलिंग आणि 4G डेटा ऑफर

मुंबई : दूरसंचार क्षेत्रातील वाढती स्पर्धा पाहत व्होडाफोनने