जिओ इफेक्ट : आयडियाला 400 कोटींचा फटका

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Monday, 15 May 2017 10:09 AM
जिओ इफेक्ट : आयडियाला 400 कोटींचा फटका

मुंबई : रिलायन्स जिओच्या आगमनानंतर टेलिकॉम क्षेत्रातील मोठ-मोठ्या कंपन्यांना फटका बसला आहे. आयडिया सेल्युलर कंपनीला 2016-17 च्या चौथ्या तिमाहीत तब्बल 328 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे.

2016-2017 या आर्थिक वर्षात आयडिया सेल्युलरला एकूण 400 कोटींच्या नुकासनाला सामोरं जावं लागलं आहे.

2015-16 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत आयडिया सेल्युलरने 452 कोटींच्या नफ्याची नोंद केली होती. शिवाय, गेल्या आर्थिक वर्षात  आयडिया सेल्युलरचा नफा 2 हजार 728 कोटी होता.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अहवालानुसार, 2016-17 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात 14.3 टक्क्यांची घट झाली असून,  चौथा तिमाहीत 8 हजार 126 कोटींच्या महसुलाची नोंद झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत 9 हजार 478 कोटींच्या महसुलाची नोंद झाली होती.

2016-17 मध्ये आयडिया सेल्युलरचा महसूल 35 हजार 576 कोटी असून, 2015-16 मध्ये 35 हजार 949 कोटी इतका महसूल होता.

दरम्यान, बिर्ला समूहाने आपली टेलिकॉम कंपनी आयडियाला व्होडाफोनमध्ये विलिन करण्याचा निर्णय घेतला आहे. 2018 मध्ये या विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे.

First Published: Monday, 15 May 2017 10:06 AM

Related Stories

पेटीएमची पेमेंट बँक लॉन्च, खात्यावरील रकमेवर 4 टक्के व्याज
पेटीएमची पेमेंट बँक लॉन्च, खात्यावरील रकमेवर 4 टक्के व्याज

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या कॅशलेस इंडियाच्या नाऱ्यानंतर

अॅपल आयफोन 8 लवकरच ग्राहकांच्या भेटीला, नवे फोटो लीक
अॅपल आयफोन 8 लवकरच ग्राहकांच्या भेटीला, नवे फोटो लीक

 मुंबई: अॅपल लवकरच म्हणजे या वर्षीच आपले तीन नवे स्मार्टफोन लाँच करु

भन्नाट कल्पना, घडी करुन बॅगेत ठेवता येणारं हेल्मेट!
भन्नाट कल्पना, घडी करुन बॅगेत ठेवता येणारं हेल्मेट!

मुंबई: दुचाकी, सायकल चालवताना हेल्मेटचा नेहमी वापर करा, असं कायम

आयपीएलमधील पराभवानंतर पुणेकर सोशल मीडियावर ट्रोल!
आयपीएलमधील पराभवानंतर पुणेकर सोशल मीडियावर ट्रोल!

मुंबई: आयपीएलचा अंतिम सामना काल (रविवार) अतिशय रंजक झाला. अवघ्या एका

कोकण रेल्वेवरील 28 स्थानकांवर वायफाय सेवा सुरु
कोकण रेल्वेवरील 28 स्थानकांवर वायफाय सेवा सुरु

सिंधुदुर्ग : डिजिटल इंडियाची कास धरत कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी

'इस्रो'चा मेगा प्लॅन, भारतात नव्या इंटरनेट युगाची सुरुवात
'इस्रो'चा मेगा प्लॅन, भारतात नव्या इंटरनेट युगाची सुरुवात

नवी दिल्ली : भारताने गेल्या वर्षी अमेरिकेला मागे टाकत सर्वात जास्त

सिंधुदुर्गातील ग्रामपंचायतीच्या कॉम्प्युटरवर ‘रॅन्समवेअर’चा हल्ला?
सिंधुदुर्गातील ग्रामपंचायतीच्या कॉम्प्युटरवर ‘रॅन्समवेअर’चा...

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : जगभरातील तंत्रज्ञान जगताला हादरवणाऱ्या

45 GB डेटा मोफत मिळवा, व्होडाफोनची ऑफर
45 GB डेटा मोफत मिळवा, व्होडाफोनची ऑफर

मुंबई : व्होडाफोनने नवीन स्मार्टफोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी नवी ऑफर

गुगलचं एक भन्नाट अॅप, सुंदर पिचाईंकडून घोषणा!
गुगलचं एक भन्नाट अॅप, सुंदर पिचाईंकडून घोषणा!

मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये गुगलचे सीईओ

VIDEO: मेट्रोत चोरून व्हिडीओ काढणाऱ्याला तरुणीने अद्दल घडवली
VIDEO: मेट्रोत चोरून व्हिडीओ काढणाऱ्याला तरुणीने अद्दल घडवली

नवी दिल्ली: मेट्रोमध्ये मोबाईलमध्ये चोरुन शूटिंग करणाऱ्या एका