'आयफोन-X'चं प्री-बुकिंग, अवघ्या काही मिनिटात 'सोल्ड आऊट'

3 नोव्हेंबर रोजी ‘आयफोन-X’ भारतात लॉन्च होणार आहे. भारतासह इंग्लंड आणि अमेरिकेतही 3 नोव्हेंबर रोजीच आयफोन-X लॉन्च होईल.

'आयफोन-X'चं प्री-बुकिंग, अवघ्या काही मिनिटात 'सोल्ड आऊट'

मुंबई : 'आयफोन-X'च्या प्री-बुकिंगला काल (27 ऑक्टोबर) सुरुवात झाली आणि अवघ्या काही मिनिटातच 'सोल्ड आऊट'चं लेबल लागलं. भारतात मोठ्या प्रमाणावर अॅपलप्रेमींना आयफोन-X बुक केला.

शुक्रवारी (27 ऑक्टोबर) दुपारी आयफोन-X च्या प्री-बुकिंगला सुरुवात झाली. त्यानंतर अॅपलप्रेमींना प्री-बुकिंगसाठी ई-कॉमर्स वेबसाईट्सवर अक्षरश: उड्या मारल्या. फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या ई-कॉमर्स साईट्सवर प्री-बुकिंग सुरु होतं.

3 नोव्हेंबर रोजी ‘आयफोन-X’ भारतात लॉन्च होणार आहे. भारतासह इंग्लंड आणि अमेरिकेतही 3 नोव्हेंबर रोजीच आयफोन-X  लॉन्च होईल.

'आयफोन-X'ची किंमत किती?

 • 64 जीबी मेमरी मॉडेल - 89 हजार रुपये

 • 256 जीबी मेमरी मॉडेल - 1 लाख 2 हजार रुपये


'आयफोन-X' ऑनलाईन उपलब्ध असून, बँक कॅशबॅक ऑफरसह एक्सचेंज ऑफर आणि सवलतीच्या ऑफरही ठेवण्यात आल्या होत्या. अमेझॉनने तर रिलायन्स जिओच्या यूझर्सना 70 टक्क्यांपर्यंतची बायबॅक गॅरंटीही दिली होती. तर फ्लिपकार्टने 52 हजार रुपयांपर्यंतच्या बायबॅक गॅरंटीची ऑफर दिली होती.

'आयफोन-X'चे फीचर्स -

 • 5.8 इंचाची सुपर रेटिना टच स्क्रीन

 • हेक्सा कोअर अॅपल 11 बायोनिक प्रोसेसर

 • 3 जीबी रॅम

 • 64 जीबी आणि 256 जीबी मेमरी व्हेरिएंट

 • 12 मेगापिक्सेल बॅक कॅमेरा

 • 7 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

 • आयओएस 77 ऑपरेटिंग सिस्टीम

 • 2716 mAh क्षमतेची बॅटरी

 • फेस रेकग्निशन सिक्युरिटी सिस्टीम

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: iPhone X sold out in few minutes latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: Apple iPhone X अॅपल आयफोन एक्स
First Published:
LiveTV