व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यानंतर सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस

कुणी विनोदी अंगाने आपला राग व्यक्त केला, तर काहींनी या गोष्टीवरही खळखळून हसवणारे विनोद केले.

व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यानंतर सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस

मुंबई : लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप जगभरात एका तासापासून बंद होतं. या दरम्यान फेसबुक आणि ट्विटरवर विनोदांचा पाऊस पडला. कुणी विनोदी अंगाने आपला राग व्यक्त केला, तर काहींनी या गोष्टीवरही खळखळून हसवणारे विनोद केले.

काही निवडक ट्वीट :

"व्हॉट्सअप डाऊनला कारणीभूत व्हॉट्सअॅपमधील इंजिनियर असावा. त्याला त्याच्या गर्लफ्रेण्डने ब्लॉक केलं असावं, अन् मग याने 'मी ब्लॉक, तर सर्वच ब्लॉक' म्हणत पूर्ण व्हॉट्सअपच डाऊन केले असावे."

https://twitter.com/imrajnish2/status/926379581472460800

"अशा लोकांसाठी दोन मिनिटं शांतता बाळगा, ज्यांनी व्हॉट्सअप डाऊननंतर व्हॉट्सअॅप अन-इन्स्टॉल करुन पुन्हा इन्स्टॉल केलं."

https://twitter.com/DigsBhatia/status/926379559062183936

"आधी ट्वीटर आणि आता व्हॉट्सअॅप, खरंतर हा आयटी कंपन्यांना इशारा आहे की तुमच्या कर्मचाऱ्यांना योग्य पगारवाढ द्या, अन्यथा अशा अडथळ्यांना सामोरे जा."

https://twitter.com/maddy_chaudhari/status/926379232502018048

व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यावर भारतीय आईची प्रतिक्रिया, Lol #WhatsAppDown

https://twitter.com/littlebit_love/status/926376216688340992

पूर्वी लाईट गेल्यावर आपण शेजारांचीही लाईट गेली का पाहायाचो, आता आपण व्हॉट्सअॅप डाऊन आहे की नाही हे पाहण्यासाठी ट्विटर चेक करतो #WhatsAppDown

https://twitter.com/chetan_bhagat/status/926369767010705408

#व्हॉटसअॅपडाऊन
#व्हॉटसअॅपअप सुरु झालं

https://twitter.com/Ali_m_bakkar/status/926374864436547584

#WhatsAppDown हे मोदींच्या डिजिटल इंडिया मोहीमेचं अपयश आहे. पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यायला हवा.

https://twitter.com/TroluKejri/status/926376651130273792

ती : हाय
तो : व्हॉट अ सरप्राईज, बऱ्याच काळाने व्हॉट्सअॅपवर
ती : व्हॉट्सअॅप सुरुय की बंद हे चेक करण्यासाठी मेसेज केला
#WhatsAppDown
https://twitter.com/karunjiruthai/status/926381395286540288

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: jokes on tweeter about whatsapp down latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV