सितारा देवी यांना गुगलचा डूडलद्वारे सलाम!

रवींद्रनाथ टागोर यांनी सितारा देवी यांना ‘नृत्य सम्राज्ञी’ अशी उपाधी दिली होती. त्यावरुन सितारा देवी यांच्या नृत्यकलेची कल्पना येऊ शकते.

By: | Last Updated: > Wednesday, 8 November 2017 7:58 AM
Kathak Legend Sitara Devi Birth anniversary Celebrates by google doodle

मुंबई: कथ्थकच्या सच्च्या उपासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सितारा देवी यांना गुगलने डूडलद्वारे सलामी दिली आहे. सितारा देवी यांच्या जयंती निमित्त गुगलने त्यांचं डूडल साकारलं आहे.

रवींद्रनाथ टागोर यांनी सितारा देवी यांना ‘नृत्य सम्राज्ञी’ अशी उपाधी दिली होती. त्यावरुन सितारा देवी यांच्या नृत्यकलेची कल्पना येऊ शकते.

वयाच्या सोळाव्या वर्षी कथ्थकसारख्या नृत्यप्रकारात, सितारा देवी यांची वीजेसारखी लखाकणारी कला पाहून, रवींद्रनाथ टागोर भारावून गेले होते.  त्यामुळेच त्यांनी सितारा देवी यांना ‘नृत्य सम्राज्ञी’ अशी उपाधी दिली होती.

सितारा देवी यांचा अल्पपरिचय

सितारा देवी यांचं मूळ नाव धनलक्ष्मी होतं. सितारा देवी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1920 रोजी  कोलाकातामधील नर्तक सुखदेव महारा यांच्या घराण्यात झाला. सितारा देवी 11 वर्षांच्या असताना त्यांचं कुटुंब मुंबईत वास्तव्यास आलं.

सितारा देवी यांना संगीत नाटक अकादमी, पद्मश्री आणि कालिदास सन्मान यांसारख्या प्रतिष्ठीत पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.

बालपणी त्यांनी काही सिनेमांमध्ये नृत्यही केलं होतं. सितारा देवी यांना 1973 मध्ये पद्मश्री पुरस्कार जाहीर केला होता, मात्र त्यांनी तो नाकारला. भारत सरकारला माझ्या योगदानाचं महत्त्व नाही. हा माझ्यासाठी सन्मान नाही तर अपमान आहे. मला भारतरत्न मिळायला हवं, असं म्हणत त्यांनी पुरस्कार नाकारला होता.

सितारा देवी यांनी बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना नृत्याचं प्रशिक्षण दिलं. मधुबाला, रेखा, माला सिन्हा आणि काजोल यांसारख्या अभिनेत्रींनी त्यांच्याकडून कथ्थकचं शिक्षण घेतलं होतं.

सितारा देवी यांनी अनेक सिनेमांमध्ये कामही केलं होतं. शहर का जादू (1934), जजमेंट ऑफ अल्लाह (1935), नगीना, बागबान, वतन (1938), मेरी आंखें (1939) होली, पागल, स्वामी (1941), रोटी (1942), चांद (1944), लेख (1949), हलचल (1950) आणि मदर इंडिया (1957) या सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं होतं.

 वयाच्या 94 व्या वर्षी अखेरचा श्वास

सितारा देवी यांचं वयाच्या 94 व्या वर्षी मुंबईच्या जसलोक रुग्णालयात निधन झालं. सितारा देवी यांना पोटदुखीच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याचवेळी उपचारादरम्यान 25 नोव्हेंबर 2014 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

Technology News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Kathak Legend Sitara Devi Birth anniversary Celebrates by google doodle
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप, नोकियाचा नवा स्मार्टफोन लाँच
दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप, नोकियाचा नवा स्मार्टफोन लाँच

नवी दिल्ली : नवा स्मार्टफोन नोकिया 2 ची किंमत किती असेल याबाबतचा

पेट्रोल-डिझेल मोफत मिळवण्याची संधी, ग्राहकांसाठी ‘ही’ खास ऑफर
पेट्रोल-डिझेल मोफत मिळवण्याची संधी, ग्राहकांसाठी ‘ही’ खास ऑफर

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किंमती कधी कमी होणार? हा सर्वसामान्यांना

फेसबुकच्या 'डिजिटल ट्रेनिंग प्रोग्राम'ला भारतातून सुरुवात
फेसबुकच्या 'डिजिटल ट्रेनिंग प्रोग्राम'ला भारतातून सुरुवात

नवी दिल्ली : 2020 पर्यंत 5 लाख भारतीयांना डिजिटल स्किल शिकवणार असल्याचं

सायबर हॅकर्सनी उबरच्या 5.7 कोटी यूजर्स आणि ड्रायव्हर्सचा डेटा चोरला!
सायबर हॅकर्सनी उबरच्या 5.7 कोटी यूजर्स आणि ड्रायव्हर्सचा डेटा चोरला!

सॅन फ्रान्सिस्को : सायबर हॅकर्सनी आपल्या 5.7 कोटी यूजर्स आणि

शाओमीच्या दोन 'मेड इन इंडिया' पॉवर बँक लाँच
शाओमीच्या दोन 'मेड इन इंडिया' पॉवर बँक लाँच

नवी दिल्ली : चीनची स्मार्टफोन मेकर कंपनी शाओमीने भारतात तिसरा प्लँट

फक्त दोन रुपयात इंटरनेट, जिओला टक्कर देणारी नवी कंपनी बाजारात!
फक्त दोन रुपयात इंटरनेट, जिओला टक्कर देणारी नवी कंपनी बाजारात!

बंगळुरु : जवळजवळ वर्षभरापूर्वी स्वस्त इंटरनेट बाजारात आणून

Olx प्रमाणे फेसबुकवरही जुन्या वस्तू विका आणि खरेदी करा!
Olx प्रमाणे फेसबुकवरही जुन्या वस्तू विका आणि खरेदी करा!

मुंबई : फेसबुकने जुन्या वस्तू खरेदी करण्यासाठी आणि विकण्यासाठी

भारतात पहिल्यांदाच 5G ची झलक, स्पीड पाहून थक्क व्हाल
भारतात पहिल्यांदाच 5G ची झलक, स्पीड पाहून थक्क व्हाल

नवी दिल्ली : भारतात नवीन 5G सेवेसाठी पायाभूत सुविधा निर्माण

व्हॉट्सअॅप कॉलिंग आणखी मजेदार, लवकरच दोन नवे फीचर्स
व्हॉट्सअॅप कॉलिंग आणखी मजेदार, लवकरच दोन नवे फीचर्स

मुंबई : व्हॉट्सअॅपने नुकतंच डिलीट फॉर एव्हरीवन फीचर दिलं आहे,

तब्बल 8GB रॅम, वनप्लस 5T लाँच
तब्बल 8GB रॅम, वनप्लस 5T लाँच

नवी दिल्ली : वनप्लसने 5T हा बहुप्रतिक्षीत स्मार्टफोन लाँच केला आहे.