5G विषयीच्या 5 खास गोष्टी

स्मार्टफोनमुळे इंटरनेट विश्वाच्या व्याख्याच बदलून गेल्या. 2G पासून सुरुवात झालेलं मोबाइल इंटरनेट हळूहळू 3G आणि आता 4G पर्यंत येऊन पोहचलं आहे. त्यामुळे आता आपली वाटचाल 5Gच्या दिशेने सुरु झाली आहे.

5G विषयीच्या 5 खास गोष्टी

मुंबई : स्मार्टफोनमुळे इंटरनेट विश्वाच्या व्याख्याच बदलून गेल्या. 2G पासून सुरुवात झालेलं मोबाइल इंटरनेट हळूहळू 3G आणि आता 4G पर्यंत येऊन पोहचलं आहे. त्यामुळे आता आपली वाटचाल 5Gच्या दिशेने सुरु झाली आहे.

5Gची सध्या नेमकी स्थिती काय आहे?

सर्वात वेगवान

5जी हे फक्त वेगवान आहे एवढंच नाही. तर याची तुलना ब्रॉडबँड कनेक्शनशी केली जात आहे. अमेरिकेत 5जीचा स्पीड हा एलटीई नेटवर्कच्या सरासरी स्पीडपेक्षा 257 पटीने अधिक आहे. जे स्नॅपड्रॅगन X50ला सपोर्ट करतं.

आता आपण फक्त 5G फर्स्ट जनरेशनचा विचार करतो आहोत. भविष्यात याचा वेग आणखी जास्त असेल.

फक्त स्पीड नाही...

5जी म्हणजे फक्त स्पीड नाही. या नेटवर्कची क्षमता प्रचंड आहे. त्यामुळे प्रत्येक स्क्वेअर किलोमीटर परिसरात लाखो मोबाइलला हे नेटवर्क मिळू शकतं.

4जी पेक्षा 5जीमध्ये अत्यंत कमी वेळात कनेक्शन मिळू शकतं. त्यामुळे डिव्हाइसेस जास्त जलद संवाद साधण्यास सक्षम असतील.

5जी फक्त फोनसाठी नाही

5 जी हे फक्त स्मार्टफोनसाठी असेल असं नाही. तर तुम्ही याचा उपयोग व्हर्च्युअल रियालिटी हेडसेट, कम्प्युटर, स्मार्ट होम डिव्हाइस यासाठीही वापरु शकता.

पण 5G हे स्वस्त नसेल!

5 जी हे प्रचंड वेगवान आणि बहुउपयोगी असल्याने त्यासाठी ग्राहकांना तसे पैसेही मोजावे लागणार आहेत. सुरुवातीला अनलिमिटेड 5जी डेटासाठी सध्या 20 ते 30 डॉलर मोजावे लागू शकतात.

पण याचा अर्थ असा नाही की, याच्या किंमती कमी होणार नाहीत. क्वॉलकॉमसारख्या कंपन्या आशावादी आहेत की, 5जी सुरु झाल्यानंतर नवी उपकरणं येतील आणि त्यामुळे या डेटाच्या किंमती कमी होतील. पण यासाठी नेमका किती वेळ लागेल हे मात्र सांगता येणार नाही.

5Gसाठी अद्याप बराच मोठा टप्पा

आपल्याला 5जीपर्यंत जाण्यासाठी एक मोठा टप्पा पार करायचा आहे. कारण की, 4जी अद्यापही व्यापक आहे. पण 2020 पर्यंत 5जी आपल्या ग्राहकांपर्यंत पूर्णपणे पोहचलेलं असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Learn about 5G 5 things latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV