13 मेगापिक्सल कॅमेरा, LGचा नवा स्मार्टफोन लाँच

एलजी इलेक्ट्रॉनिक्सनं बुधवारी 'LG Q6' स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.

13 मेगापिक्सल कॅमेरा, LGचा नवा स्मार्टफोन लाँच

मुंबई : एलजी इलेक्ट्रॉनिक्सनं बुधवारी 'LG Q6' स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. ज्याची किंमत 14,990 रुपये आहे. बाजारात या स्मार्टफोनची स्पर्धा मोटोरोला आणि ओप्पोच्या स्मार्टफोनशी असणार आहे.

या स्मार्टफोनमध्ये 5 इंच स्क्रीन दिली असून याचं रेझ्युलेशन 2160x1080 पिक्सल आहे. यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 435 प्रोसेसर आहे. तसेच 3 जीबी रॅमसह 32 जीबी मेमरीही देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉईड नॉगट 7.1 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असणार आहे.

या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याची बॅटरी 3000 mAh आहे. तसेच यात 4G VoLTE, वाय-फाय, ब्ल्यूटूथ, यूएसबी पोर्ट, यासारखे अनेक फीचर आहेत.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV