व्हील हबमध्ये बिघाड, सुझुकीनं 21,494 डिझायर कार परत मागवल्या

मारुती सुझुकीनं काही महिन्यापूर्वीच शानदार डिझायर कार लाँच केली होती. पण आता कंपनीनं 21,494 कार परत मागवल्या आहेत

व्हील हबमध्ये बिघाड, सुझुकीनं 21,494 डिझायर कार परत मागवल्या

 

मुंबई : मारुती सुझुकीनं काही महिन्यापूर्वीच शानदार डिझायर कार लाँच केली होती. पण आता कंपनीनं 21,494 कार परत मागवल्या आहेत. कंपनीच्या मते, या कारच्या रिअर व्हील हबमध्ये बिघाड असल्याची माहिती मिळाली आहे. या सर्व कार 20 फेब्रुवारी 2017 ते 10 जुलै 2017 मध्ये तयार करण्यात आल्या आहेत.

मारुती सुझुकीकडून मिळालेल्या माहितीनुसार आपल्या कारमध्ये वरील समस्या आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी ग्राहकानं आपल्या कारचा चेसिस नंबर कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर टाकून त्याबाबत माहिती घ्यावी.

ज्या ग्राहकांनी कार 23 फेब्रुवारी 2017 ते 10 जुलै 2017मध्ये तयार झाली आहे त्यांनी आपली कार आपल्या जवळच्या मारुती सुझुकीच्या डीलरकडे नेऊन द्यावी. ते त्यातील बिघाड मोफत दुरुस्त करुन देतील.

कंपनीनं यावर्षी मे महिन्यात डिझायर कार लाच केली होती. आकर्षक डिझाइन आणि खास फीचर यामुळे ग्राहकांनी या कारला बरीच पसंती दिली होती. अवघ्या सहा महिन्यात या कारने एक लाख विक्रीचा आकडा पार केला होता. या कारच्या पेट्रोल व्हेरिएंटचा अॅव्हरेज 22 किमी आणि डिझेल व्हेरिएंटचा अॅव्हरेज 28.4 किमी प्रति लीटर आहे.

बातमी सौजन्य : cardekho.com

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: maruti suzuki recalled dzire car latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV