13 मेगापिक्सेल रिअर ड्युअल कॅमेरा, मोटो G5S प्लसचे फोटो लीक

लेनोव्हो लवकरच मोटो जी 5 एस प्लस आणि मोटो जी 5 एस हे दोन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. मोटो जी 5 एस प्लसचा नुकताच एक फोटो लीक झाला आहे, ज्यामध्ये या फोनला ड्युअल रिअर कॅमेरा असल्याचं दिसत आहे.

By: | Last Updated: > Monday, 17 July 2017 3:05 PM
moto g 5 s plus photos leaked showing 13 megapixel dual rear camera

Photo : slashleaks

मुंबई : लेनोव्हो लवकरच मोटो जी 5 एस प्लस आणि मोटो जी 5 एस हे दोन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. मोटो जी 5 एस प्लसचा नुकताच एक फोटो लीक झाला आहे, ज्यामध्ये या फोनला ड्युअल रिअर कॅमेरा असल्याचं दिसत आहे.

मोटोने आत्ताच भारतात मोटो ई 4 आणि मोटो ई 4 प्लस हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. याशिवाय न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे, ज्यामध्ये मोटो झेड 2 फोर्स आणि मोटो एक्स 4 हे दोन स्मार्टफोन लाँच केले जाण्याची शक्यता आहे.

मोटो जी 5 एस मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा असेल, असं ‘स्लॅशलीक्स’च्या वृत्तात म्हटलं आहे. तर काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या मोटो जी 5 प्लसला केवळ सिंगल कॅमेरा देण्यात आला होता. मोटो जी 5 एस प्लसला 13 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा असण्याची शक्यता आहे. तर मोटो जी 5 प्लसप्रमाणेच 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असेल, असं बोललं जात आहे.

लीक फोटोंनुसार मोटो जी 5 एस प्लसची स्क्रीन 5.5 इंच आकाराची असेल. तर मेटल बॉडी आणि 7.1.1 अँड्रॉईड नॉगट सिस्टम असेल, असा अंदाज आहे. 4 GB रॅम, 64 GB स्टोरेज, स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर आणि गोल्ड, सिल्व्हर आणि ब्लॅक या कलर्समध्ये हा फोन उपलब्ध असेल.

यापूर्वीही या स्मार्टफोनच्या बाबतीत माहिती समोर आली होती. मोटो जी 5 एस प्लस, मोटो एक्स 4 आणि मोटो झेड 2 फोर्स हे तिन्ही स्मार्टफोन लाँच केले जाणार असल्याचं वृत्त होतं. मोटो जी 5 एस प्लसची किंमत 17 हजार 999 रुपये, मोटो एक्स 4 ची 20 हजार 999 रुपये आणि मोटो झेड 2 फोर्सची किंमत 38 हजार 999 रुपये असेल, असाही दावा या वृत्तात करण्यात आला होता.

Technology News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:moto g 5 s plus photos leaked showing 13 megapixel dual rear camera
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

BSNL च्या 2 हजार मॉडेमवर मालवेअर हल्ला
BSNL च्या 2 हजार मॉडेमवर मालवेअर हल्ला

नवी दिल्ली : बीएसएनएल या सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनीने

2040पासून ब्रिटनमध्ये पेट्रोल, डिझेल आणि हायब्रिड कारच्या विक्रीवर बंदी
2040पासून ब्रिटनमध्ये पेट्रोल, डिझेल आणि हायब्रिड कारच्या विक्रीवर...

इंग्लंड : वायू प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे

दिवसाला तब्बल 3जीबी 4G डेटा, Airtelचा नवा प्लॅन 
दिवसाला तब्बल 3जीबी 4G डेटा, Airtelचा नवा प्लॅन 

मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलनं एक नवा डेटा टेरिफ

अमेझॉनचा संस्थापक जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती!
अमेझॉनचा संस्थापक जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती!

  मुंबई: जगातील सर्वात मोठी ऑनलाईन शॉपिंग कंपनीअमेझॉन इंकच्या

व्हॉट्सअॅपचं लवकरच आणखी एक अॅप लॉन्च होणार
व्हॉट्सअॅपचं लवकरच आणखी एक अॅप लॉन्च होणार

मुंबई : सोशल मीडियात महत्त्वाचं अॅप मानलं जाणारं व्हॉट्सअॅप लवकरच

जीएसटीनंतर स्मार्टफोन विक्रीवर काय फरक पडला?
जीएसटीनंतर स्मार्टफोन विक्रीवर काय फरक पडला?

लंडन : भारतात दरवर्षी मोबाइल फोनच्या मागणीत प्रचंड वाढ होत असल्याचं

नोकिया 8 च्या लाँचिंगचा मुहूर्त अखेर ठरला!
नोकिया 8 च्या लाँचिंगचा मुहूर्त अखेर ठरला!

नवी दिल्ली : एचएमडी ग्लोबलकडून नोकिया 8 हा स्मार्टफोन 16 ऑगस्ट रोजी

तब्बल 6GB रॅम, मोटोचा नवा हायटेक फीचर्स फोन लाँच
तब्बल 6GB रॅम, मोटोचा नवा हायटेक फीचर्स फोन लाँच

नवी दिल्ली : मोटोरोलाचा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन मोटो Z2 फोर्स लाँच

4G स्पीडमध्ये एअरटेल नंबर वन, जिओ शेवटच्या स्थानी : ओपनसिग्नल
4G स्पीडमध्ये एअरटेल नंबर वन, जिओ शेवटच्या स्थानी : ओपनसिग्नल

मुंबई : इंटरनेट स्पीडची तपासणी करणारी फर्म ओपनसिग्नलनं एअरटेल

Yu Yunique 2  स्मार्टफोन लाँच, किंमत 5,999 रुपये
Yu Yunique 2 स्मार्टफोन लाँच, किंमत 5,999 रुपये

मुंबई : YU टेलिवेंचर आणि मायक्रोमॅक्सनं YU युनिक 2 हा स्मार्टफोन लाँच