दोन दिवस चालणारी बॅटरी, नोकियाचा नवा स्मार्टफोन लाँच

भारतीय बाजारात हा नोकियाचा पाचवा अँड्रॉईड फोन आहे. आतापर्यंत नोकिया 3 हा कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन होता. मात्र आता त्याची जागा नोकिया 2 ने घेतली आहे.

दोन दिवस चालणारी बॅटरी, नोकियाचा नवा स्मार्टफोन लाँच

नवी दिल्ली : नोकियाने भारतात स्वस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. नोकिया 2 हा स्मार्टफोन दिल्लीत झालेल्या इव्हेंटमध्ये लाँच करण्यात आला. 4100mAh क्षमतेची बॅटरी हे या फोनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे साडे सात हजार रुपयांच्या आसपास या फोनची किंमत असेल. या फोनची बॅटरी दोन दिवस बॅकअप देते, असा दावा कंपनीने केला आहे.

भारतीय बाजारात हा नोकियाचा पाचवा अँड्रॉईड फोन आहे. कंपनीने सर्वात अगोदर नोकिया 6, नोकिया 3 आणि नोकिया  5 लाँच करण्यात आला. त्यानंतर फ्लॅगशिप स्मार्टफोन नोकिया 8 आणि आता नोकिया 2 लाँच करण्यात आला. आतापर्यंत नोकिया 3 हा कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन होता. मात्र आता त्याची जागा नोकिया 2 ने घेतली आहे.

नोकिया 2 चे फीचर्स

  • 5 इंच आकाराची स्क्रीन

  • 4100mAh क्षमतेची बॅटरी

  • 1.3GHz क्वाड कोअर प्रोसेसर

  • 8 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा

  • 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

  • 1GB रॅम, 8GB स्टोरेज

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Nokia 2 launched with 41mah battery
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: nokia 2 नोकिया 2
First Published:
LiveTV