दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप, नोकियाचा नवा स्मार्टफोन लाँच

या महिन्याच्या सुरुवातीला लाँच झालेल्या या फोनची किंमत किती असेल, याबाबत माहिती देण्यात आली नव्हती.

दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप, नोकियाचा नवा स्मार्टफोन लाँच

नवी दिल्ली : नवा स्मार्टफोन नोकिया 2 ची किंमत किती असेल याबाबतचा सस्पेंस कंपनीने अखेर संपवला आहे. भारतात नोकिया 2 ची किंमत 6999 रुपये असेल. या महिन्याच्या सुरुवातीला लाँच झालेल्या या फोनची किंमत किती असेल, याबाबत माहिती देण्यात आली नव्हती.

या किंमतीचा फोन असल्याने नोकिया 2 ची टक्कर रेडमी 4A आणि मोटो C प्लसशी होईल, असं बोललं जात आहे. 24 नोव्हेंबर म्हणजे आजपासून हा फोन ऑफलाईन विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

नोकिया 2 चे फीचर्स

  • मेटल फ्रेम आणि कर्निंग गोरिल्ला ग्लास

  • 5 इंच आकाराची स्क्रीन

  • अँड्रॉईड 7.0 (अँड्रॉईड 8.0 अपडेट मिळणार)

  • 4100 mAh क्षमतेची बॅटरी

  • स्नॅपड्रॅगन 212 प्रोसेसर

  • 1GB रॅम, 8GB इंटर्नल स्टोरेज

  • 8 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

  • गुगल असिस्टंट, GPS, वाय-फाय, एफएम रेडियो

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Nokia 2 price revealed available for sale
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: nokia 2 नोकिया 2
First Published:
LiveTV