'नोकिया 3310' च्या या मॉडेलची किंमत तब्बल 1,13,200 रुपये!

By: | Last Updated: > Tuesday, 7 March 2017 8:53 PM
'नोकिया 3310' च्या या मॉडेलची किंमत तब्बल 1,13,200 रुपये!

मुंबई : नोकियाने फेब्रुवारीमध्ये नोकिया 3310 हा सर्वाधिक लोकप्रिय फोन पुन्हा रिलॉन्च केला. त्यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये या फोनची प्रतिक्षा आहे. भारतात या फोनची किंमत 3 हजार पाचशे रुपये ठेवण्यात आली आहे.

भारतात या फोनची किंमत साडे तीन हजार रुपये असली तरी, रशियामध्ये हा फोन यूनिक पद्धतीत मिळणार आहे. रशियाची प्रिमियम स्मार्टफोन मेकर कंपनी ‘कॅव्हियर’ने नोकिया 3310 चं रिस्टाईल व्हर्जन तयार केलं आहे. या मॉडेलचं नाव नोकिया 3310 सुप्रीमो पुतिन असं आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या फोटोसह हा फोन बनला असून फोनवर रशियाच्या राष्ट्रगीताची एक ओळही लिहिण्यात आली आहे. या फोनची किंमत तब्बल 1 लाख 13 हजार 200 रुपये ठेवण्यात आली आहे.

नोकियाचा रशियामधील हा फोन ड्युअल गोल्ड कोटेड आणि ड्युअल इलेट्रोप्लेटेड टेक्नोलॉजीसह येणार आहे.

नोकिया 3310 मध्ये 2.4 इंचाची कव्हर्ड स्क्रीन आणि बटन असलेला की-बोर्ड असणार आहे. 2 मेगापिक्सलचा फ्लॅश लाईट कॅमेरा, हेडफोन, ड्युअल सिम, एफएम रेडियो, 16 एमबी इंटरनल स्टोरेज क्षमता जी 32 जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. या मोबाईलची बॅटरी 1200 mAh क्षमतेची आहे.

तब्बल 17 वर्षांनंतर नोकिया 3310 नव्या स्वरूपात येत आहे.  2005 साली बंद झालेल्या या मोबाईलचे 12 कोटींपेक्षाही जास्त युनिट विकल्या गेले होते.

संबंधित बातम्या :

नव्या रंगात, नव्या ढंगात, बहुप्रतिक्षित नोकिया 3310 रिलाँच

नोकियाचा धमाका ! ‘नोकिया 3310’ रि-लॉन्च, सोबत 2 नवे स्मार्टफोन बाजारात

नोकिया 3310 फोनच्या फर्स्ट लूकचा व्हिडिओ उजेडात

 

First Published:

Related Stories

6GB RAM, 4000mAh बॅटरी, 'हुआवे'चा नवा स्मार्टफोन लाँच
6GB RAM, 4000mAh बॅटरी, 'हुआवे'चा नवा स्मार्टफोन लाँच

नवी दिल्ली : हुआवेने ऑनर ब्रँडचा ‘ऑनर 8 प्रो’ हा स्मार्टफोन

आजपासून ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर धमाकेदार ऑफर्स
आजपासून ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर धमाकेदार ऑफर्स

मुंबई : आजपासून ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर धमाकेदार ऑफर्स देण्यात

ह्युंदाईच्या नव्या वेरना कारची पहिली झलक
ह्युंदाईच्या नव्या वेरना कारची पहिली झलक

मुंबई: ह्युंदाईनं आपल्या नव्या वेरना सेडान कारचं टीझर नुकतंट लाँच

जिओकडून ग्राहकांना आणखी एक खास भेट!
जिओकडून ग्राहकांना आणखी एक खास भेट!

मुंबई: रिलायन्स जिओनं आपल्या ग्राहकांसाठी एक खास भेट दिली आहे.

मोस्ट अवेटेड ‘वनप्लस 5’ अखेर लॉन्च, 8 जीबी रॅमसह जबरदस्त फीचर्स
मोस्ट अवेटेड ‘वनप्लस 5’ अखेर लॉन्च, 8 जीबी रॅमसह जबरदस्त फीचर्स

मुंबई : स्मार्टफोनप्रेमींसाठी उत्सुकतेचा विषय ठरेलला ‘वनप्लस 5’

BSNL चे दोन नवे ईद स्पेशल प्लॅन, दररोज 3GB डेटा मिळणार
BSNL चे दोन नवे ईद स्पेशल प्लॅन, दररोज 3GB डेटा मिळणार

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने

OLX वरुन कारमालकांना गंडा!
OLX वरुन कारमालकांना गंडा!

डोंबिवली : ओएलएक्सवरुन कारमालकांना हेरुन त्यांची फसवणूक करत कार

होंडाची ‘CLIQ’ स्कूटर लॉन्च, स्वस्त आणि मस्त!
होंडाची ‘CLIQ’ स्कूटर लॉन्च, स्वस्त आणि मस्त!

जयपूर : होंडा मोटर सायकल अँड स्कूटर इंडियाने बुधवारी जयपूरमध्ये

पॅनासॉनिकचा एलुगा आय 3 मेगा स्मार्टफोन लाँच
पॅनासॉनिकचा एलुगा आय 3 मेगा स्मार्टफोन लाँच

मुंबई: मोबाइल कंपनी पॅनासॉनिकनं आपल्या एलुगा सीरीजमधील एक नवा