नोकिया 6 चं 4GB रॅम व्हेरिएंट लाँच, किंमत आणि फीचर्स

16 हजार 999 रुपये किंमत असलेला हा फोन 20 फेब्रुवारीपासून उपलब्ध होईल.

नोकिया 6 चं 4GB रॅम व्हेरिएंट लाँच, किंमत आणि फीचर्स

नवी दिल्ली : एचएमडी ग्लोबलने नोकिया 6 या फोनचं 4GB रॅम व्हेरिएंट लाँच केलं आहे. हा स्मार्टफोन विक्रीसाठी केवळ फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. 16 हजार 999 रुपये किंमत असलेला हा फोन 20 फेब्रुवारीपासून उपलब्ध होईल.

या फोनच्या 3GB रॅम व्हेरिएंटची किंमत 14 हजार 999 रुपये आहे. एचएमडी ग्लोबलने गेल्या वर्षी नोकिया 6 हा फोन लाँच केला होता. या फोनचं 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज व्हेरिएंट लाँच करण्यात आलं होतं.

Nokia 6 चे स्पेसिफिकेशन

  • अँड्रॉईड 7.0 नॉगट सिस्टम

  • 5.5 इंच आकाराची स्क्रीन

  • क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 चिपसेट

  • 4GB रॅम, 64GB इंटर्नल स्टोरेज

  • 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा (ऑटो फेस डिटेक्शन, ड्युअल टोन फ्लॅश)

  • 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

  • 3000mAh क्षमतेची बॅटरी

  • डॉल्बी अॅटमॉस, ड्युअल अॅम्प्लिफायर

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: nokia 6 with 4gb ram launched will be flipkart exclusive
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV