आता घरच्या घरी वीजनिर्मिती करा !

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Friday, 17 March 2017 3:44 PM
आता घरच्या घरी वीजनिर्मिती करा !

नवी दिल्ली : आता घरच्या घरी वीजनिर्मिती करणं शक्य होणार आहे. घराच्या छतावर सोलर पॅनल लावून विजेची किलोवॅटमध्ये निर्मिती करणं आता सामान्य माणसांच्या आवाक्यात येणार आहे. यासाठी पूर्व प्रकल्पासाठी केवळ 60 हजार रुपये मोजावे लागतील. किंबहुना, जर केंद्र सरकारकडून यासाठी 30 टक्के अनुदान मिळालं, तर हीच रक्कम आणखी कमी होईल.

म्हणजेच एका स्मार्टफोनच्या किंमतीत दोन पंखे आणि दोन ट्युबलाईट्सला जितकी विज लागेल, तिचा खर्च निघेल, एवढी विजेची सामान्य माणूस घरच्या घरीच निर्मिती करु शकेल.

तुम्ही सुमारे 50 हजार रुपये सोलर पॅनल्समध्ये गुंतवले, तर जवळपास 3 वर्षे तुम्हाला विजेचा फायदा घेता येईल. एक वर्षापूर्वी सौर उर्जेच्या प्रत्येक किलोवॅटमागे 90 हजार रुपयांचा खर्च येत होता.

गेल्या पाच ते सहा वर्षात सोलर मॉड्युल्सच्या किंमती जवळपास 85 टक्क्यांनी घटल्या आहेत, असे सौर उर्जेच्या क्षेत्रात काम कऱणाऱ्या ब्रिज टू इंडियाचे असोशिएट डायरेक्टर जसमित खुराना यांनी सांगितले.

एका वर्षाचा विचार केल्यास एक किलोवॅट वीज म्हणजे 1400 यूनिट विजेच्या बरोबरीची आहे. सोलर पॅनल सिस्टम 25 वर्षे राहते. त्यामुळे सौर उर्जेच्या माध्यमातून वीजनिर्मिती नक्कीच फायदेशीर ठरतान दिसते आहे.

सोलर पॅनल बसवायचे असल्यास उघड्यावर (सावली येत नसेल अशी जागा) किमान 120 स्केअर फूट एवढी हवी. राजधानी दिल्लीत सौर उर्जेची क्षमता 2200 मेगावॅट आहे आणि दिल्लीची विजेची एकूण मागणी 6600 मेगावॅट आहे.

ग्रीनपीस इंडियाचे कॅम्पेनर पुजारीनी सेन यांनी सोलर पॅनलचा खर्च कमी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, “सोलर पॅनल आर्थिकदृष्ट्या सोईचं झाल्याने प्रदुषणावर मात करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. 2022 सालापर्यंत 100GW सौरउर्जेच्या निर्मितीचं उद्दिष्ट भारताचं आहे.”

First Published: Friday, 17 March 2017 3:42 PM

Related Stories

5G तंत्रज्ञानासाठी एरिक्सनचा पुढाकार, IIT दिल्लीसोबत करार
5G तंत्रज्ञानासाठी एरिक्सनचा पुढाकार, IIT दिल्लीसोबत करार

मुंबई : भारतीय टेलिकॉम क्षेत्रात आधी 2जी, 3जी आणि आता 4जीची चलती आहे.

न्यूड फोटो काढल्यास पालकांना अलर्ट देणारं अॅप
न्यूड फोटो काढल्यास पालकांना अलर्ट देणारं अॅप

मुंबई : जर मुलांनी आपल्या स्मार्टफोनवर एखादा न्यूड फोटो काढला किंवा

फ्लिपकार्टची नो रिफंड पॉलिसी मागे!
फ्लिपकार्टची नो रिफंड पॉलिसी मागे!

मुंबई : फ्लिपकार्टने नो रिफंड पॉलिसी मागे घेतली आहे. ग्राहकांची

11 महिन्याच्या मुलीला गळफास, लाईव्ह पाहून फेसबुकही हादरलं
11 महिन्याच्या मुलीला गळफास, लाईव्ह पाहून फेसबुकही हादरलं

बँकॉक : थायलंडमधील हादरवून टाकणाऱ्या घटनेने फेसबुक लाईव्हवर

iPhone 7 वर 20,000 रुपयांची बंपर सूट
iPhone 7 वर 20,000 रुपयांची बंपर सूट

मुंबई : फ्लिपकार्टवर 24 एप्रिल ते 26 एप्रिल दरम्यान ‘अॅपल डेज

रिलायन्स जिओला सहा महिन्यात 22.50 कोटींचा तोटा
रिलायन्स जिओला सहा महिन्यात 22.50 कोटींचा तोटा

मुंबई : रिलायन्स जिओला मार्च 2017 पर्यंत म्हणजे गेल्या सहा महिन्यात 22.50

गूगलने सांगितली 'अर्थ डे'ची अनोखी कथा...
गूगलने सांगितली 'अर्थ डे'ची अनोखी कथा...

नवी दिल्ली : आपण सर्वांनीच जागतिक पृथ्वी दिनाविषयी शालेय पुस्तकात

नको ते मेसेज फॉरवर्ड केल्यास ग्रुप अॅडमिनला बेड्या
नको ते मेसेज फॉरवर्ड केल्यास ग्रुप अॅडमिनला बेड्या

मुंबई : व्हॉट्सअॅप आणि फेसबुक ग्रुपवर अक्षेपार्ह मजकूर फॉरवर्ड

BSNL चा धमाका, 333 रुपयात दररोज 3GB डेटा
BSNL चा धमाका, 333 रुपयात दररोज 3GB डेटा

मुंबई: टेलिकॉम जगतातील तगड्या स्पर्धेत टिकण्यासाठी सरकारी कंपनी

'एचटीसी यू'च्या लॉन्चिंगचा मुहूर्त ठरला!
'एचटीसी यू'च्या लॉन्चिंगचा मुहूर्त ठरला!

नवी दिल्ली : एचटीसी स्मार्टफोनचा स्वत:चा असा एक यूझर वर्ग आहे.