बहुप्रतीक्षित 'वनप्लस 5' स्मार्टफोनच्या लॉन्चिंगचा मुहूर्त ठरला!

बहुप्रतीक्षित 'वनप्लस 5' स्मार्टफोनच्या लॉन्चिंगचा मुहूर्त ठरला!

मुंबई : 'वनप्लस 5' या बहुप्रतीक्षित स्मार्टफोनच्या लॉन्चिंगचा मुहूर्त अखेर जाहीर झाला आहे. 20 जून रोजी भारत वगळता संपूर्ण जगभरातील बाजारपेठेत 'वनप्लस 5' लॉन्च होणार आहे, तर भारतात 22 जून रोजी हा स्मार्टफोन लॉन्च केला जाणार आहे.

वनप्लसच्या ऑफिशियल यूट्यूबवरुन 'वनप्लस 5'च्या लॉन्चिंगचा इव्हेंट लाईव्ह दाखवला जाणार आहे. रात्री 9.30 वाजल्यापासून यूट्यूबवर इव्हेंट लाईव्ह टेलिकास्ट होईल. त्यामुळे स्मार्टफोनप्रेमी अगदी लॉन्चिंगपासूनच या स्मार्टफोनशी जोडले जाऊ शकतील.

भारतात लॉन्चिंग कधी?

मुंबईत 22 जून रोजी 'वनप्लस 5' स्मार्टफोन लॉन्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे मुंबईतील या इव्हेंटसाठी वनप्लसच्या यूझर्सनाही आमंत्रण देण्यात आले आहे. त्यानंतर संध्याकाळी 4.30 वाजल्यापासून अमेझॉन इंडियावर आणि वनप्लस इंडियाच्या स्टोअरमध्ये हा स्मार्टफोन खरेदीसाठीही उपलब्ध करुन दिला जाईल.

किंमत किती?

'वनप्लस 5' स्मार्टफोनची किंमत अद्याप ठरलेली नाही. जागतिक स्तरावर या स्मार्टफोनची किंमत जाहीर झाल्यानंतर भारतात किती किंमत असेल, याचाही अंदाज बांधला जाऊ शकतो. मात्र, 33 हजार ते 38 हजार रुपयांदरम्यान या स्मार्टफोनची किंमत असेल. अर्थात, रॅमच्या क्षमतेनुसार दोन्ही व्हेरिएंटच्या किंमती कमी जास्त असतील. ज्यांना 'वनप्लस 5' स्मार्टफोन खरेदी करायचा असले, अशा ग्राहकांना अमेझॉन इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल.

फीचर्स काय असतील?

  • 'वनप्लस 5'मध्ये स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर

  • 5.5 इंचाचा एचडी डिस्प्ले

  • 6 जीबी रॅम/64 जीबी स्टोरेज

  • 8 जीबी रॅम/128 जीबी

  • स्पोर्ट ड्युअल रिअर कॅमेरा

  • अँड्रॉईड नोगट 7.1.1 OS

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV