आधार लिंकिंगच्या या चार डेडलाईन चुकवू नका!

सरकारने आधार लिंक करणं अनिवार्य केलेल्या काही महत्त्वाच्या सेवांची यादी..

आधार लिंकिंगच्या या चार डेडलाईन चुकवू नका!

मुंबई/नवी दिल्ली : यावेळी नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करण्याअगोदर तुम्हाला महत्त्वाच्या चार सेवांसोबत तुमचं आधार कार्ड लिंक करायचं आहे. आधार लिंक करण्याच्या नियमाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणी पुढील वर्षीपर्यंत स्थगित करण्याची मागणी सरकारने कोर्टाकडे केली आहे.

आधार लिंक करण्यासाठी ज्या डेडलाईन देण्यात आल्या आहेत, त्या वाढवण्याचं आश्वासनही सरकारने दिलं आहे. मात्र डेडलाईन वाढण्याची वाट न पाहता आत्ताच ही प्रक्रिया पूर्ण करुन घेणं सोपं आहे. सरकारने आधार लिंक करणं अनिवार्य केलेल्या काही महत्त्वाच्या सेवांची यादी..

आधार सिम लिंकिंग

सध्या चालू असलेले सर्व मोबाईल क्रमांक पुन्ही रिव्हेरिफाय करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तर नवीन सिम घेण्यासाठीही आधार कार्ड अनिवार्य आहे. 6 फेब्रुवारीपर्यंत सर्वांना आपला मोबाईल नंबर रिव्हेरिफाय करायचा आहे. अन्यथा नंबर बंद पडू शकतो.

आधार आणि आर्थिक सेवा

बँक अकाऊंट, क्रेडिट कार्ड, विमा पॉलिसी, इक्विटी, म्युच्युअल फंड, पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजना अशा सेवांसाठी तुमचं आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य आहे. यासाठी 31 डिसेंबर 2017 ची डेडलाईन देण्यात आली आहे.

आधार आणि पॅन लिंकिंग

आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी 31 डिसेंबर 2017 ही अखेरची तारीख आहे. आधार पॅन कार्डशी लिंक न केल्यास तुम्हाला आयकर रिटर्न भरता येणार नाही.

आधार आणि अनुदान योजना

सरकारकडून ज्या योजनांसाठी अनुदान देण्यात येतं त्यासाठीही तुम्हाला आधारची माहिती देणं अनिवार्य आहे. या योजनांच्या लाभार्थींसाठी 31 डिसेंबर 2017 ही डेडलाईन आहे. यापूर्वी ही तारीख 30 सप्टेंबर होती. एलपीजी अनुदान, शिष्यवृत्ती योजना, पेंशन आणि शिधापत्रिका धारकांना आधारचा तपशिल देणं गरजेचं आहे.

आधार कार्ड पॅनसोबत कसं लिंक कराल?

आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर ई-फायलिंग ही नवीन सुविधा देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर अगोदर तुमचा पॅन क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर आधार नंबर लागेल आणि त्याखालीच आधार नंबरवर असलेलं नाव टाकावं लागेल.

pan-link

वरील सर्व माहिती अचूक टाकल्यानंतर खाली दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून ‘लिंक आधार’ या पर्यायावर क्लिक करावं लागेल. यानंतर लगेच तुमचं आधार कार्ड पॅनशी लिंक होईल.

दरम्यान आधार कार्ड आणि पॅनवर असणारी जन्म तारीख एक असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड येईल. तो पासवर्ड टाकून पुढील प्रक्रिया करावी लागेल.

संबंधित बातम्या :

मोबाईल आणि आधार लिंक करताना या दहा गोष्टी लक्षात ठेवा


आधार कार्ड लिंकसाठी मेसेज पाठवून ग्राहकांना घाबरवू नका : सुप्रीम कोर्ट


बँक खात्याशी आधार लिंक न केल्यास काय होईल?


PPF आणि पोस्ट ऑफिस खात्यांना आधार लिंक करणं अनिवार्य


तुमचं बँक खातं आणि आधार लिंक आहे का? असं चेक करा

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: PAN banking sim and financial services don’t miss these four deadlines of aadhar linking
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV