तुम्ही मोबाईलच्या आहारी गेला आहात?, इथं चेक करा!

'तुम्ही मोबाईलचे मालक आहात, मोबाईल तुमचा मालक नाही.' या टॅगलाइनखाली मोटोरोलानं #phonelifebalance ही मोहीम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुरु केली आहे.

तुम्ही मोबाईलच्या आहारी गेला आहात?, इथं चेक करा!

मुंबई : तंत्रज्ञानच्या युगात आपण तांत्रिक ज्ञान आत्मसात केलं नाही तर मागे पडू अशी आज प्रत्येकालाच भीती वाटू लागली आहे. त्यातही मोबाईलसारखं डिव्हाइस आपल्या हाती आल्यानं त्यावर आपण बरंच अवलंबून राहू लागलो आहोत. इतंकच नाही तर आपण अक्षरश: मोबाईलच्या आहारी जात असल्याचंही समोर येत आहे. त्यामुळे आता एका मोबाईल कंपनीनेच याबाबत एक आगळीवेगळी मोहीम सुरु केली आहे.

होय... मोटोरोला सारख्या नामांकित मोबाईल कंपनीनं #phonelifebalance ही मोहीम सुरु केली असून यूजर्सला एक प्रकारे सावध करण्याचा त्यांनी प्रयत्न त्यांनी सुरु केला आहे.

'तुम्ही मोबाईलचे मालक आहात, मोबाईल तुमचा मालक नाही.' या टॅगलाइनखाली  मोटोरोलानं #phonelifebalance ही मोहीम सोशल मीडियावर सुरु केली आहे.

फोटो सौजन्य : मोटोरोला फोटो सौजन्य : मोटोरोला

आजची तरुणाई प्रत्यक्ष भेटी-गाठींपेक्षा मोबाइलच्या माध्यमातूनच एकमेकांशी कनेक्ट होऊ लागली आहेत. साधारणपणे याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तसंच आपण फोनच्या प्रचंड आहारी जाऊ लागलो आहोत. चार लोकं एकत्र आल्यानंतरही जवळजवळ प्रत्येकजण हा फोनमध्येच गढून गेलेला असतो. या गोष्टीचं प्रमाण कमी होणं गरजेचं आहे. हे ओळखून मोटोरोलानं हे नवं पाऊल उचललं आहे.

वारंवार फोन चेक करणं, सतत फोन आपल्या हातात असणं ही फोनच्या आहारी जाण्याची लक्षणं आहेत. पण याशिवाय देखील काही कारणं आहेत. ज्यामुळे आपण नकळतपणे फोनच्या आहारी जातो. आपण फोनच्या आहारी गेलो आहात की नाही हे तपासण्यासाठी मोटोरोलानं एका खास 'क्विझही' (प्रश्नावली) आणलं आहे. यामध्ये यूजर्ससाठी फोन वापरासंबंधी काही वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले आहेत. या प्रश्नाची उत्तरं दिल्यानंतर तुम्ही फोनच्या किती आहारी गेले आहात याचं उत्तर तुम्हाला तात्काळ मिळेल. यासाठी वेगवेगळ्या लेव्हल देण्यात आल्या आहेत. तुम्ही जर पाचव्या लेव्हलपर्यंत पोहचलात तर तुम्ही फोनच्या प्रचंड आहारी गेला आहात एवढं निश्चित. त्यामुळे फोन हेच आयुष्य आहे असं मानणाऱ्यांसाठी ही नक्कीच धोक्याची घंटा आहे. त्यामुळे वेळीच यापासून सावरणं गरजेचं आहे.


तुम्ही फोनच्या आहारी गेला आहात?... चेक करण्यासाठी इथं क्लिक करा. 


 

दरम्यान, #phonelifebalance हा हॅशटॅग ट्विटरवर पाहायला मिळत आहे. मोटोरोलाच्या या मोहीमेत अभिनेत्री सोहा अली खान देखील सहभागी झाली आहे. सोहा अली म्हणते की, 'फोनचा वापर मी गरजेपुरता करते.' त्यामुळे तिने देखील एक प्रकारे फोनचा कमी वापर करण्याचं आवाहन सर्वांना केलं आहे.मोटोरोलानं फोन लाईफ बॅलन्स (Phone-life balance)यासाठी जी प्रश्नावली विचारली आहे त्याच्याच आधारावर एक डेटाही त्यांनी जाहीर केला आहे.

फोन लाईफ बॅलन्समधील (Phone-life balance) डेटावर एक नजर :

प्रश्न : तुम्ही कुटुंब आणि फोन यापैकी कुणापासून आठवड्याभर दूर राहू शकता?

moto phone life balance data 1

45 टक्के पुरुष हे फोनपेक्षा आपल्या कुटुंबाला प्राधान्य देतात. म्हणजेच अजूनही 55 टक्के पुरुष हे आपल्या फोनला महत्त्व देतात. त्यांच्यामते ते कुटुंबापासून आठवडाभर दूर राहू शकतात. पण आपल्या मोबाइलपासून ते दूर राहू शकत नाही.

moto phone life balance data 2

तर 41 टक्के महिला या आपल्या कुटुंबाला प्राधान्य देतात. याचाच अर्थ तब्बल 59 टक्के महिलांनी आपला मोबाईल महत्त्वाचा वाटतो.

प्रश्न : तुम्ही किती तास तुमचा फोन तुमच्या हाताजवळ ठेवता?

moto phone life balance data 5

या डेटानुसार यूजर्स जवळजवळ 11 तास आपला फोन हाताजवळ ठेवतात.

प्रश्न : एखाद्या अंत्ययात्रेत तुम्ही तुमचा फोन चेक करता का?

moto phone life balance data 3

डेटानुसार प्रत्येकी 10 पैकी एक व्यक्ती ही अंत्ययात्रेला गेली असताना देखील आपला फोन चेक करते.

moto phone life balance data 6

फोन आणि आयुष्य यांचा योग्य मेळ घालणाऱ्या शहरांमध्ये भारतातील मंगलोरचा पहिला क्रमांक लागतो.

moto phone life balance data 4

तर याचबाबतीत स्लोव्हाकिया या देशाचा प्रथम क्रमांक लागतो. यामध्ये भारत पहिल्या पाचामध्ये देखील नाही.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: phone life balance motorola’s new campaign latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV