ट्विटरवर #BlockNarendraModi मोहीम

जगभरातील सर्वाधिक फॉलोअर्सपैकी एक असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना, आता अनेकजण तातडीने अनफॉलो करत आहेत.

ट्विटरवर #BlockNarendraModi मोहीम

मुंबई: जगभरातील सर्वाधिक फॉलोअर्सपैकी एक असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना, आता अनेकजण तातडीने अनफॉलो करत आहेत.

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवर, #BlockNarendraModi ही मोहीम चालवली जात आहे.

टोकाची भाषा वापरुन ट्रोल करणाऱ्यांना विरोध म्हणून ही मोहीम सुरु करण्यात आली आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर निखिल दधीच यांच्या @nikhildadhich या ट्विटर हॅण्डलवरुन, वादग्रस्त ट्विट करण्यात आलं होतं. मात्र याच ट्विटरला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी फॉलो करत असल्याचं समोर आलं. त्यानंतर #BlockNarendraModi या मोहिमेने उचल घेतली.

Nikhil Dadhich tweet

काही लोकांनी नरेंद्र मोदींच्या ट्विटर अकाऊंटला ब्लॉक करुन, त्याचे स्क्रीन शॉट ट्विट केले. त्यानंतर ही मोहिम वाढत जाऊन पुढे ट्रेण्ड बनली.

https://twitter.com/Iam_Prerna/status/905647369005305860

प्रेरणा नावाच्या युझरने म्हटलंय की, "जर आमचे पंतप्रधान अशा मूर्खांना फॉलो करत असतील तर पंतप्रधानांनाच ब्लॉक करावं लागेल"

https://twitter.com/humourously_urs/status/905681709311582208

https://twitter.com/Vidyut/status/905520682808647680

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: #BlockNarendraModi PM Narendra Modi trolls Twitter unfollowing
First Published:
LiveTV