भारतात पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली!

अमृतसर, लखनौ, अलपुझा आणि त्रिचूर यांसारख्या शहरांमध्ये चाईल्ड पोर्नोग्राफी संबंधित फाईल्स शेअर करण्याचं प्रमाण जास्त आहे.

भारतात पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली!

मुंबई : भारतात पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. स्वस्त स्मार्टफोन आणि मोफत डेटामुळे पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचं समोर आलं आहे. पॉर्नहब वेबसाईटचे आकडे धक्कादायक आहेत. भारतात पॉर्न पाहण्याची सरासरी वेळ 8.22 मिनिट आहे, तर प्रतिदिन पॉर्न वेबसाईटला भेट देण्याची सरासरी वेळ 7.32 आहे.

बीबीसी हिंदीने अॅनालिटिक्स कंपनी 'विडुली'च्या संस्थापक आणि सीईओ सुब्रत कौर यांच्याशी बातचीत करुन याबाबतचं वृत्त दिलं आहे. यावर्षी जानेवारीमध्ये एक रिपोर्ट समोर आला होता. अमृतसर, लखनौ, अलपुझा आणि त्रिचूर यांसारख्या शहरांमध्ये चाईल्ड पोर्नोग्राफी संबंधित फाईल्स शेअर करण्याचं प्रमाण जास्त आहे, असं त्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं.

निमशहरांमध्ये पोर्नोग्राफी सर्च करण्याचं आणि पाहण्याचं प्रमाण जास्त आहे. जानेवारी 2016 मधील एका रिपोर्टनुसार, पॉर्न पाहणाऱ्यांच्या यादीत अमेरिका आणि इंग्लंडनंतर भारत तिसऱ्या स्थानावर आहे. भारताने कॅनडालाही मागे टाकलं आहे.

सरकारने पॉर्न साईट्सवर बंदी आणण्यासाठी पावलं उचलली होती. 800 पॉर्न साईट्सवर बंदी घालण्यात आली. मात्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. मोबाईलवर पॉर्न पाहणं सुरक्षित नसल्याचं 2015 साली एका रिपोर्टमधून समोर आलं होतं. या माध्यमातून हॅकर्स युझर्सकडून डेबिट, क्रेडिट कार्डची माहितीही चोरु शकतात.

इंटरनेटवर जेवढा कंटेट आहे, त्यापैकी 37 टक्के पॉर्न आहे, असं ऑप्टनेम संस्थेने 2010 साली आपल्या अभ्यासात म्हटलं होतं. मात्र 2017 पर्यंत स्वस्त स्मार्टफोन आणि मोफत डेटामुळे ही आकडेवारी वाढतच चालली आहे.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: porn watching habbit increasing in india
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV