7 मार्चला रेडमी नोट 5 आणि नोट 5 प्रोचा खास सेल

शाओमीने 14 फेब्रुवारी रोजी भारतात रेडमी नोट 5 आणि रेडमी नोट 5 प्रो हे दोन स्मार्टफोन लाँच केले होते. या फोनचा दुसरा सेल 7 मार्च रोजी होणार आहे.

7 मार्चला रेडमी नोट 5 आणि नोट 5 प्रोचा खास सेल

मुंबई : शाओमीने 14 फेब्रुवारी रोजी भारतात रेडमी नोट 5 आणि रेडमी नोट 5 प्रो हे दोन स्मार्टफोन लाँच केले होते. या फोनचा दुसरा सेल 7 मार्च रोजी होणार आहे आणि याच दिवशी कंपनी ग्राहकांना खास भेट देणार आहे.

7 मार्चला होणाऱ्या या सेलमध्ये रेडमी नोट 5 प्रोचं 6GB रॅम व्हेरिएंट उपलब्ध होणार आहे. याशिवाय या स्मार्टफोनचे चार कलर व्हर्जन ब्लॅक, गोल्ड, रोज गोल्ड आणि लेक ब्ल्यू उपलब्ध असतील.

रेडमी नोट 5 प्रोचं फक्त 6GB रॅम व्हेरिएंटच उपलब्ध होणार आहे. फ्लिपकार्ट आणि mi.com वर दुपारी 12 वाजल्यापासून हे फोन विक्रीसाठी उपलब्ध असतील.

रेड मी नोट 5 चे स्पेसिफिकेशन

रेड मी नोट 5 हे गेल्या वर्षीच्या रेड मी नोट 5 चं नवं व्हर्जन आहे. यामध्ये 5.99 इंच आकाराची स्क्रीन, स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर आणि अँड्रॉईड नॉगट सिस्टम देण्यात आली आहे. या शिवाय 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि 4000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन ब्लॅक, गोल्ड, रोज गोल्ड आणि ब्ल्यू कलरमध्ये उपलब्ध होईल.

रेडमी नोट 5 प्रोची किंमत

रेड मी नोट 5 प्रोचा ग्लोबल लाँच आज दिल्लीत आयोजित करण्यात आला होता. हा बजेट कॅमेरा स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या फोनचे 4GB रॅम आणि 6GB रॅम असे दोन व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहेत. 4GB रॅम व्हेरिएंटची किंमत 13 हजार 999 रुपये, तर 6GB रॅम व्हेरिएंटची किंमत 16 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे.

रेडमी नोट 5 प्रोचे स्पेसिफिकेशन

रेडमी नोट 5 प्रो या फोनमध्ये 5.9 इंच आकाराची स्क्रीन, स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर, 12MP+5MP ड्युअल रिअर कॅमेरा, ब्यूटीफाय 4.0, 20 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, फ्रंट कॅमेऱ्यासाठी पोर्ट्रेट मोड, 64 GB इंटर्नल स्टोरेज आणि 4000mAh क्षमतेची बॅटरी असे फीचर्स यामध्ये देण्यात आले आहेत.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: redmi note 5 redmi note 5 pro all color variant be available on march 7 sale
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV