अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग, रिलायन्स कम्युनिकेशनचा नवा प्लॅन

टेलिकॉम कंपन्यांमधील वाढती स्पर्धा पाहता आता अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशनंही एक नवा टेरिफ प्लॅन आणला आहे.

अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग, रिलायन्स कम्युनिकेशनचा नवा प्लॅन

मुंबई : मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओमुळे जवळजवळ सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी नवे आणि स्वस्त टेरिफ प्लॅन आणले आहेत. वाढती स्पर्धा पाहता आता अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशनंही असाच एक नवा प्लॅन आणला आहे.

जिओला टक्कर देण्यासाठी रिलायन्स कम्युनिकेशननं 299 रुपये किंमतीचा नवा प्लॅन आणला आहे. कंपनीनं ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे.

 या ट्वीटनुसार हा टेरिफ प्लॅन सर्वात स्वस्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि मेसेज मिळणार आहे. 299 रुपयांच्या या प्लॅनची वैधता महिन्याभरासाठी असणार आहे.

मात्र, या प्लॅनची संपूर्ण माहिती कंपनीनं ट्वीटरवर दिलेली नाही. ही ऑफर मिळवण्यासाठी यूजर्सला Eshop.com वर जावं लागेल.

रिलायन्स कम्युनिकेशन ही अनिल अंबानी यांची कंपनी आहे. जी सध्या आपले ग्राहक कायम ठेवण्यासाठी नवनवे प्लॅन आणत आहे. रिलायन्स जिओनं फ्री डेटा दिल्यानंतर टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले होते. त्यानंतर व्होडाफोन, एअरटेल, आयडियासह कंपन्यांनी स्वस्त प्लॅन आणले.

सध्या जिओच्या 399 रुपयांच्या धन धना धन ऑफरला टक्कर देण्यासाठी व्होडाफोननं 352 रुपये, एअरटेलनं 399 रुपयांचे नवे प्लॅन आणले आहेत.

(नोट : संबंधित ऑफरनुसार रिचार्ज करण्यापूर्वी तुमच्या नंबरसाठी ही ऑफर आहे किंवा नाही, याची कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवरुन खात्री करा)

संबंधित बातम्या :

अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा 7 रुपयात, व्होडाफोनची नवी ऑफर!

399 रुपयात 84 GB डेटा, एअरटेलची ऑफर

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV