इंटरनेट स्पीडमध्ये जिओ अव्वल, एअरटेल सर्वात शेवटी

भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरण अर्थात ट्रायने ‘माय स्पीड’ या पोर्टलवर, जुलै महिन्यातील टेलिकॉम कंपन्यांचं इंटरनेट स्पीड जाहीर केलं आहे.

इंटरनेट स्पीडमध्ये जिओ अव्वल, एअरटेल सर्वात शेवटी

नवी दिल्ली: टेलिकॉम क्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या रिलायन्स जिओने नवा आयाम गाठला आहे. देशात 4G सेवा देणाऱ्या प्रमुख चार कंपन्यांमध्ये जिओचं स्पीड सर्वाधिक असल्याचं समोर आलं आहे.

जिओचं जुलैमधील सरासरी डाऊनलोड स्पीड 18.65 mbps इतकं असून, ते पहिल्या क्रमांकावर आहे.

तर देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेल या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरण अर्थात ट्रायने ‘माय स्पीड’ या पोर्टलवर, जुलै महिन्यातील टेलिकॉम कंपन्यांचं इंटरनेट स्पीड जाहीर केलं आहे. त्यामध्ये जिओचं डाऊनलोड स्पीड 18.65 mbps असल्याचं म्हटलं आहे.

दुसरीकडे एअरटेलचं सरासरी स्पीड सर्वात कमी म्हणजे 8.91 mbps इतकं नोंदवण्यात आलं आहे.

या यादीत व्होडाफोन 11.07 mbps स्पीडसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 9.46mbps स्पीडसह आयडीय तिसऱ्या क्रमांकावर आहे.

ट्रायच्या ‘माय स्पीड’ या पोर्टलवर ग्राहक्यांच्या सूचनांच्या आधारे सरासरी डाऊनलोड स्पीड दाखवण्यात येतं.

यापूर्वी जिओचं जूनमध्ये सरासरी डाऊनलोड स्पीड 18.80mbps तर मे मध्ये 19.12 mbps इतकं नोंदवण्यात आलं होतं.

मे आणि जूनमध्येही व्होडाफोन, आयडिया आणि एअरटेल हे जिओच्या मागेच होते.

Telicom speed

टेलिकॉम कंपनी  जुलै (स्पीड) जून (स्पीड) मे (स्पीड)
रिलायन्स जिओ 18.65 mbps 18.80 mbps 19.12 mbps
व्होडाफोन 11.07 mbps 12.29 mbps 13.38 mbps
आयडिया 9.46 mbps 11.68 mbps 13.70 mbps
एअरटेल 8.91 mbps 8.22 mbps 10.15 mbps

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV