JioFi वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, ग्राहकांसाठी खास ऑफर

या जिओफायची किंमत आता 999 रुपये आहे. जी आधी 1,999 रुपये होती. तसेच जिओफाय आता तुम्ही फ्लिपकार्ट आणि jio.comवरुन खरेदी करु शकता.

JioFi वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, ग्राहकांसाठी खास ऑफर

मुंबई : रिलायन्स जिओनं आपल्या 4G हॉटस्पॉट डोंगल जिओफायवर (JioFi)भरघोस सूट दिली आहे. सणांचा मुहूर्त साधत रिलायन्स ही ऑफर आणली आहे. ही ऑफर 20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत असणार आहे.

या जिओफायची किंमत आता 999 रुपये आहे. जी आधी 1,999 रुपये होती. तसेच जिओफाय आता तुम्ही फ्लिपकार्ट आणि jio.comवरुन खरेदी करु शकता.

jio12

जिओफाय फेस्टिव्हल ऑफर फक्त JioFi M2S मॉडलवर उपलब्ध आहे. ज्याची बॅटरी 2300 mAh आहे. या जिओफायसोबत जिओ सिमही मिळणार आहे. जिओफायवर ग्राहकांना तब्बल 1000 रुपयांची सूट मिळणार आहे. या पोर्टेबल वाय-फाय राउटरच्या मदतीनं आपण कुठेही इंटरनेट कनेक्ट करु शकतात.

जिओफाय डिव्हाइस हे सर्व रिलायन्स डिजिटल स्टोअर, जिओ आऊटलेट्स, जिओ पार्टनर रिटेलर्स आणि jio.comवरुन खरेदी करता येईल.

(टीप : ऑफरसाठी संबंधित कंपनीच्या वेबसाइट किंवा अॅपवरुन त्याबाबत संपूर्ण माहिती घ्या.)

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV