रेनॉल्ट डस्टरच्या किंमतीत तब्बल 1 लाख रुपयांची कपात

रेनॉल्टने डस्टर एसयूव्ही कारच्या किंमतीत भरघोस कपात केली आहे. या कारची किंमत तब्बल 1 लाखांपर्यंत कमी झाली आहे.

रेनॉल्ट डस्टरच्या किंमतीत तब्बल 1 लाख रुपयांची कपात

मुंबई : रेनॉल्टची डस्टर कार घेण्याचा तुम्ही जर विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण रेनॉल्टने डस्टर एसयूव्ही कारच्या किंमतीत भरघोस कपात केली आहे. या कारची किंमत तब्बल 1 लाखांपर्यंत कमी झाली आहे. नव्या किंमती 1 मार्च 2018 पासून लागू करण्यात आल्या आहेत.

duster car

पाहा रेनॉल्ट डस्टरच्या जुन्या आणि नव्या किंमती :

duster car 2-

मॉडेल जुनी किंमत नवी किंमत  किंमतीतील अंतर
आरएक्सई 8.50 लाख रुपये 7.95 लाख रुपये 55,925 रुपये
आरएक्सएल 9.30 लाख रुपये 8.79 लाख रुपये 51,816 रुपये
आरएक्सएस सीव्हीटी पेट्रोल 10.24 लाख रुपये 9.95 लाख रुपये 29,746 रुपये
एसटीडी 85 पीएस पेट्रोल 10.24 लाख रुपये 8.95 लाख रुपये 50,663 रुपये
आरएक्सई 85 पीएस डिझेल 9.65 लाख रुपये 9.09 लाख रुपये 56,560 रुपये
आरएक्सएस 85 पीएस डिझेल 10.74 लाख रुपये 9.95 लाख रुपये 79,034 रुपये
आरएक्सजेड 85 पीएस डिझेल 11.65 लाख रुपये 10.89 लाख रुपये 76,237 रुपये
आरएक्सजेड 110 पीएस डिझेल 12.49 लाख रुपये 11.79 लाख रुपये 70,976 रुपये
आरएक्सजेड 110 पीएस एएमटी डिझेल 13.09 लाख रुपये 12.33 लाख रुपये 76,970 रुपये
आरएक्सजेड 110 पीएस एडब्ल्यूडी डिझेल 13.79 लाख रुपये 12.79 लाख रुपये 1 लाख रुपये

वर दिलेल्या आकड्यांनुसार आरएक्सएस सीव्हीटी पेट्रोलची किंमत सर्वात कमी आणि आरएक्सझेड 110 पीएस एडब्ल्यूडी डिझेलच्या किंमतीत सर्वात जास्त कपात करण्यात आली आहे. या कपातीनंतर डस्टरचा टॉप मॉडेल हा ह्युंदाई क्रेटापेक्षा 2.73 लाखांनी स्वस्त झाला आहे. कंपनीने घेतलेल्या या नव्या निर्णयामुळे डस्टरच्या विक्रीत वाढ होण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी सौजन्य : cardekho.com 

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: renault duster gets a price cut of up to rs 1 lakh latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV