पाकिस्तानवाल्यांनो तुम्ही जिंका, पण दहशतवाद थांबवा: ऋषी कपूर

पाकिस्तानवाल्यांनो तुम्ही जिंका, पण दहशतवाद थांबवा: ऋषी कपूर

मुंबई: अभिनेते ऋषी कपूर यांनी पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत ट्विट करुन पाकिस्तानी चाहत्यांना उत्तर दिलं आहे.

सेमीफायनलमध्ये पाकिस्तानने मिळवलेल्या विजयानंतर, ऋषी कपूर यांनी ट्विट केलं होतं. त्यावरुन पाकिस्तानी चाहत्यांनी ऋषी कपूर यांच्यावर टीकेचा भडीमार केला होता.

त्याला उत्तर देताना ऋषी कपूर म्हणाले, "तुम्ही जिंका, हजार वेळा जिंका. फक्त दहशतवाद थांबवा. मला हार मान्य आहे. आम्हाला शांतता आणि प्रेम हवं"

https://twitter.com/chintskap/status/875447907922567170

भारताकडून हरण्यास तयार राहा 

यापूर्वी ऋषी कपूर यांनी ट्विट केलं होतं. सेमीफायनलमध्ये पाकिस्तानने इंग्लंडला हरवून फायनलमध्ये धडक मारली होती. त्यावर ऋषी कपूर यांनी ट्विट करुन, पाकिस्तानला त्यांच्या स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र आता फायलनमध्ये भारताकडून हरण्यासाठी तयार राहा अशा आशयाचं ट्विट केलं होतं. 

"विजयाबद्दल अभिनंदन, तुम्हाला भारताच्या निळ्या रंगात पाहून चांगलं वाटलं. आता भारताकडून हरण्यासाठी तयार राहा", असं ट्वीट ऋषी कपूर यांनी केलं.

https://twitter.com/chintskap/status/875024879501717506

भारताची फायनलमध्ये धडक

विराट कोहलीच्या टीम इंडियानं बर्मिंगहॅमच्या उपांत्य सामन्यात बांगलादेशचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवून फायनलमध्ये धडक मारली.

या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला 50 षटकांत सात बाद 264 धावांत रोखून टीम इंडियाची निम्मी मोहीम फत्ते केली होती. मग रोहित शर्माच्या नाबाद शतकानं भारताचा विजय आणखी सोपा केला.

रोहितनं शिखर धवनच्या साथीनं 87 धावांची दमदार सलामी दिली. मग त्यानं आणि विराट कोहलीनं दुसऱ्या विकेटसाठी 178 धावांची अभेद्य भागीदारी रचून टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

संबंधित बातम्या

आता भारताकडून हरण्यासाठी तयार राहा, ऋषी कपूर यांच्या पाकला शुभेच्छा 

'फादर्स डे'ला मुलासोबत फायनल, सेहवागचं हटके ट्विट 

रविवारी ड्रीम फायनल, बांगलादेशला धूळ चारत टीम इंडियाची फायनलमध्ये धडक!

पाकिस्तानविरुद्धचा सामना इतर सामन्यांप्रमाणेच : विराट कोहली

8 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा कोहली सर्वात वेगवान फलंदाज

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV