लाँचिंगआधीच सॅमसंग Galaxy Note 8 स्मार्टफोनचे फीचर लीक

सॅमसंगचा Galaxy Note 8 हा स्मार्टफोन येत्या काही दिवसातच लाँच होणार आहे. पण त्याआधीच त्या स्मार्टफोनचे फीचर लीक झाले आहेत.

By: | Last Updated: > Thursday, 3 August 2017 7:28 PM
samsung galaxy note 8 full specifications leaked latest update

मुंबई : सॅमसंग लवकरच आपला नवा स्मार्टफोन गॅलक्सी नोट 8 लाँच करणार आहे. 23 ऑगस्टला या स्मार्टफोनचं लाँचिंग होणार असल्याचं समजतं आहे. पण त्याआधीच या स्मार्टफोनचा लूक आणि किंमत लीक झाली आहे.

इव्हान ब्लास याने आपल्या ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात असा दावा करण्यात आला आहे की, हा गॅलक्सी नोट 8 आहे. त्यासोबत एक लिंकही देण्यात आली आहे. ज्यामध्ये या स्मार्टफोनच्या फीचरबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

 

लीक माहितीनुसार, गॅलक्सी नोट 8चा लूक हा गॅलक्सी S8 सीरीज सारखाच आहे. यामध्ये मेटल ड्यूल रिअर कॅमेरा दिसून येत आहे.

या स्मार्टफोनमध्ये 6.3 इंच स्क्रीन असेल तर याचं रेझ्युलेशन 1440×2960 पिक्सल असेल. असा दावा करण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये प्रोसेसर Exynos 8895 SoC देण्यात आलं असून तब्बल 6 जीबी रॅमही देण्यात आल्याचं या लीक रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे कॅमेरा. यामध्ये 12 मेगापिक्सलचा ड्यूल रिअर कॅमेरा असणार आहे. तर 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल.

रिपोर्टनुसार, सॅमसंग गॅलक्सी नोट 8 मध्ये 3300 mAh बॅटरी असेल.

सॅमसंग Galaxy Note 8 किंमत किती?

सॅमसंग गॅलक्सी नोट 8ची किंमत 999 युरो म्हणजेच 76,000 रुपये असू शकते.दरम्यान, ही माहिती नेमकी किती अचूक हे 23 ऑगस्टला समजणार आहेच.

Technology News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:samsung galaxy note 8 full specifications leaked latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

फक्त एक मेसेज आणि जिओ फीचर फोनची नोंदणी
फक्त एक मेसेज आणि जिओ फीचर फोनची नोंदणी

मुंबई : जिओचा फीचर फोन खरेदी करण्यासाठी अनेक जण इच्छुक असल्याचं

कॉल ड्रॉप झाल्यास 10 लाखांपर्यंत दंड, 'ट्राय'ची कठोर पावलं
कॉल ड्रॉप झाल्यास 10 लाखांपर्यंत दंड, 'ट्राय'ची कठोर पावलं

मुंबई : कॉल ड्रॉपचे प्रमाण रोखण्यासाठी ‘ट्राय’ अर्थात भारतीय

लेनोव्हो K8 नोट स्मार्टफोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध
लेनोव्हो K8 नोट स्मार्टफोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध

मुंबई : लेनोव्होचा नवा स्मार्टफोन K8 नोट आज भारतात फ्लॅश सेलमध्ये

इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी विशाल सिक्का यांचा राजीनामा
इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी विशाल सिक्का यांचा राजीनामा

मुंबई : भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी

चीनकडून डेटाचोरी, चोरी रोखण्यासाठी मोदी सरकारचा मास्टरप्लॅन 
चीनकडून डेटाचोरी, चोरी रोखण्यासाठी मोदी सरकारचा मास्टरप्लॅन 

नवी दिल्ली : चीनकडून होणारी डेटाचोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारने

399 रुपयात 84 जीबी डेटा, एअरटेलचा नवा प्लॅन
399 रुपयात 84 जीबी डेटा, एअरटेलचा नवा प्लॅन

मुंबई : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेलनं जिओला टक्कर

टाटा टियागो एक्सटीए कार लाँच, किंमत 4.79 लाख
टाटा टियागो एक्सटीए कार लाँच, किंमत 4.79 लाख

मुंबई : टाटानं टियागो कारचं नवं ऑटोमॅटिक व्हेरिएंट एक्सटीए लाँच

मारुती सुझुकीची सियाज एस कार लाँच, किंमत 9.39 लाख
मारुती सुझुकीची सियाज एस कार लाँच, किंमत 9.39 लाख

  मुंबई : मारुती सुझुकीनं सियाज कारचं नवं व्हेरिएंट सियाज एस लाँच

असुसचा 'झेनफोन झूम एस' भारतात लाँच
असुसचा 'झेनफोन झूम एस' भारतात लाँच

मुंबई : असुसने गुरुवारी ‘झेनफोन झूम एस’ हा स्मार्टफोन लाँच केला

दररोज अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग, व्होडाफोनची ऑफर
दररोज अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग, व्होडाफोनची ऑफर

नवी दिल्ली : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने दमदार ऑफर