Samsung Anniversary Sale: सॅमसंगच्या अनेक स्मार्टफोनवर घसघशीत सूट

सॅमसंगनं 25 ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान, 'सॅमसंग शॉप अॅनिव्हर्सरी' या सेलचं आयोजन केलं आहे. या सेलमध्ये सॅमसंगचे अनेक स्मार्टफोन स्वस्तात मिळणार आहे.

Samsung Anniversary Sale: सॅमसंगच्या अनेक स्मार्टफोनवर घसघशीत सूट

मुंबई : स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास आता एक सुवर्णसंधी आहे. कारण की, सॅमसंगनं आपल्या अनेक स्मार्टफोनवर घसघशीत सूट दिली आहे. सॅमसंगनं 25 ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान, 'सॅमसंग शॉप अॅनिव्हर्सरी' या सेलचं आयोजन केलं आहे. या सेलमध्ये सॅमसंगचे अनेक स्मार्टफोन स्वस्तात मिळणार आहे.

गॅलक्सी S8+ : सॅमसंगच्या गॅलक्सी S8+ स्मार्टफोनच्या किंमतीत तब्बल 7000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे 60,900 रुपये किंमतीचा हा फोन 53,900 रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय 4000 रुपये अधिक डिस्काउंट देण्यात येत आहे. एचडीएफसी डेबिट आणि क्रेडिट कार्ड यूजर्सला या स्मार्टफोनवर अधिकचं डिस्काउंट देणार आहे. त्यामुळे एचडीएफसी कार्ड यूजर्सला हा स्मार्टफोन 49,900 रुपयांना मिळू शकतो.

गॅलक्सी On मॅक्स : या स्मार्टफोनवर 1000 रुपये सूट देण्यात आली आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन 15,900 रुपयात खरेदी करता येणार आहे.

गॅलक्सी On Nxt : या स्मार्टफोनवर 2,000 रुपयांची सूट देण्यात आली असून हा स्मार्टफोन 13,900 रुपयात खरेदी करता येईल. आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड यूजर्सला 5 टक्के सूट मिळणार आहे.

गॅलक्सी On7 Pro, J3 Pro : हे दोन्ही स्मार्टफोन अनुक्रमे 7,590 आणि 7,090 रुपयात उपलब्ध आहे. यांची किंमत आधी 8,990 आणि 7,990 रुपये आहे.

गॅलक्सी On7 : हा स्मार्टफोन 6590 रुपयांना उपलब्ध आहे.

गॅलक्सी On5 : हा स्मार्टफोन या सेलमध्ये 6,490 रुपयांना मिळणार आहे.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV