काय आहे Sarahah अॅप? तुमची ओळख गुप्त कशी राहते?

तुमच्या अकाऊंटची मेसेज लिंक फेसबुक अकाऊंटवर शेअर करा. यानंतर तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. तुमचे मित्र तुम्हाला मेसेज पाठवत जातील.

By: | Last Updated: > Friday, 11 August 2017 3:25 PM
Sarahah app going viral what is it and how does it work latest update

मुंबई : sarahah या अॅपच्या लिंक्स सध्या फेसबुकच्या न्यूज फीडमध्ये वारंवार दिसत आहेत. यावरुन तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या मनातली गोष्ट सांगू शकता, मात्र तुमची ओळख गोपनीय राहील. तुमच्या मनात
एखाद्याविषयी असलेलं प्रेम किंवा तिरस्कार तुम्ही त्याच्यापर्यंत पोहचवू शकाल. आयडेंटिटी गुप्त राहत असल्यामुळे या अॅपवर अनेकांच्या उड्या पडत आहेत.

‘साराहाह’ची लिंक तुमच्या फेसबुक फ्रेंड्सनी शेअर केली असेलच. गेल्या दोन दिवसात सोशल मीडियावर Sarahah च्या लिंक्सचा पूर आला आहे. या लिंकवर क्लिक करा आणि साईन इन करुन तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या मनातला प्रश्न विचारु शकता.

Sarahah वर अकाऊण्ट कसं ओपन कराल?

गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल स्टोअरवरुन तुम्ही Sarahah अॅप डाऊनलोड करु शकता. iOS फाइल 22 एमबी,
तर अँड्रॉईड फाईल 12 एमबीची आहे. अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही साईन इन करा.

तुमच्या अकाऊंटची मेसेज लिंक फेसबुक अकाऊंटवर शेअर करा. यानंतर तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. तुमचे मित्र तुम्हाला मेसेज पाठवत जातील. मात्र मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव तुम्हाला समजणार नाही, हीच या अॅपची गंमत आहे.

संबंधित मेसेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज बॉक्स दिसेल. त्यावर तुम्ही तुमचं उत्तर लिहून पाठवू शकता. सौदी अरेबियातील जेन अबीदिन तौफिकने हे अॅप तयार केलं आहे. हे सोशल मीडिया अॅप असून जुलै 2017 मध्ये लेटेस्ट अपडेट करण्यात आलं आहे.

Sarahah चे साइड-इफेक्ट काय आहेत?

मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख गुप्त राहणार असल्यामुळे कोणतीही व्यक्ती कोणालाही कशाही प्रकारचा मेसेज पाठवू शकते. यामध्ये शिवराळ किंवा अश्लील मेसेजचाही समावेश होतो. तुम्हाला मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटणार नसल्यामुळे त्याचा गैरवापर होण्याची भीती आहे. अर्थातच अशा मेसेजविरोधात सायबर क्राईमकडे तक्रार करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

Technology News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Sarahah app going viral what is it and how does it work latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

UC ब्राऊजरवर चीनला भारतीय ग्राहकांचा डेटा विकल्याचा आरोप
UC ब्राऊजरवर चीनला भारतीय ग्राहकांचा डेटा विकल्याचा आरोप

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अली बाबाचं UC मोबाईल

प्रतीक्षा संपली! Moto G5S Plus चा लाँचिंग मुहूर्त ठरला
प्रतीक्षा संपली! Moto G5S Plus चा लाँचिंग मुहूर्त ठरला

मुंबई : लेनोव्होने काही दिवसांपूर्वीच मोटो G5S आणि मोटो G5S प्लस हे दोन

जिओ फीचर फोनची विक्री फक्त ऑनलाईनच!  
जिओ फीचर फोनची विक्री फक्त ऑनलाईनच!  

मुंबई : रिलायन्सच्या 4G VoLTE फीचर फोन लवकरच ग्राहकांचा हातात येणार आहे.

ह्युंदाईच्या नव्या वेरना कारचं आज लाँचिंग
ह्युंदाईच्या नव्या वेरना कारचं आज लाँचिंग

मुंबई : ह्युंदाईची नवी वेरना कार आज लाँच होणार आहे. या कारची किंमत 7.99

सर्वात वेगवान आणि स्मार्ट! अँड्रॉईड 'ओ' 8.0 चं नामकरण
सर्वात वेगवान आणि स्मार्ट! अँड्रॉईड 'ओ' 8.0 चं नामकरण

न्यूयॉर्क : अँड्रॉईड ‘ओ’ 8.0 चं अखेर नामकरण करण्यात आलं आहे. जगातील

15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असणारे काही खास फोन
15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असणारे काही खास फोन

मुंबई : बाजारात दररोज नवनवीन स्मार्टफोन लाँच होतात. मात्र किंमती,

16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, शाओमीचा नवा फोन लाँच
16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, शाओमीचा नवा फोन लाँच

नवी दिल्ली : शाओमीने नोट 5 सीरिज या फोनचं अपडेटे व्हर्जन नोट 5A हा

गुगल ओपन करण्यापूर्वी आता व्हिडिओ प्ले होणार!
गुगल ओपन करण्यापूर्वी आता व्हिडिओ प्ले होणार!

सॅन फ्रान्सिस्को : खास अपडेट देताना गुगलने मोबाईल सर्च रिझल्टमध्ये

 तब्बल 6GB रॅम, कूलपॅड कूल प्ले 6 भारतात लाँच
तब्बल 6GB रॅम, कूलपॅड कूल प्ले 6 भारतात लाँच

मुंबई : कूलपॅडने नवीन स्मार्टफोन कूल प्ले 6 भारतात लाँच केला आहे. 14

जिओ फोन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी काय कराल?
जिओ फोन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी काय कराल?

मुंबई : रिलायन्स जिओने सर्वात स्वस्त फीचर फोन देण्याची घोषणा