सोनीचा मिररलेस A7R III कॅमेरा लाँच, किंमत 2,64,999 रुपये

सोनी इंडियानं आज एक नवा फूल-फ्रेम 'ए7 आर3' इंटरचेंजेबल मिररलेस कॅमेरा भारतात लाँच केला आहे. याची किंमत तब्बल 2,64,990 रुपये आहे.

सोनीचा मिररलेस A7R III कॅमेरा लाँच, किंमत 2,64,999 रुपये

मुंबई : सोनी इंडियानं आज एक नवा फूल-फ्रेम 'ए7 आर3' इंटरचेंजेबल मिररलेस कॅमेरा भारतात लाँच केला आहे. याची किंमत तब्बल 2,64,990 रुपये आहे. या कॅमेऱ्यात हाय-रेझ्युलेशन 42.4 मेगापिक्सल आहे. याचं शूटिंग स्पीड 10 फ्रेम प्रति सेकंद आहे.

या कॅमेऱ्यात 4K व्हिडीओ क्वॉलिटी, वाइड डायनामिक रेंज आणि नोयॉज रिडक्शन यासारखे फीचरही देण्यात आले आहेत. हा कॅमेरा लाइव्ह यू मोडमध्ये सलग 8 फ्रेम प्रति सेकंद एवढ्या वेगानं शूट करु शकतो.

हा कॅमेरा 'इमेजिंग एज' सॉफ्टवेअर सुईटसोबत येणार आहे. जे यूजर्सला प्री-प्रोसेसिंगपासून पोस्ट-प्रोसेसिंगपर्यंत मदत करतं. या कॅमेऱ्याच्या बॅटरी लाइफमध्ये पहिल्यापेक्षा अधिक सुधारणा करण्यात आली आहे.

या कॅमेऱ्यात वाय-फाय हे फीचरही असणार आहे. ज्याच्या मदतीनं स्मार्टफोन, टॅबलेट, कम्प्युटर किंवा एफटीपी सर्व्हरमध्ये अगदी सहजपणे फाइल ट्रान्सफर करता येईल.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: sony india launched a7r iii mirrorless camera latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV