Sony Xperia XZच्या किंमतीत भरघोस कपात, तब्बल 10 हजारांची सूट

By: | Last Updated: > Thursday, 16 March 2017 6:15 PM
sony xperia xz price cut now available in 39,990 Rs

मुंबई: सोनीनं आपल्या एक्सपीरिया एक्स झेड य स्मार्टफोनमध्ये भरघोस कपात केली आहे. या स्मार्टफोनवर तब्बल 10 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे.

सोनीनं Xperia XZ हा स्मार्टफोन मागील वर्षी सप्टेंबरमध्ये लाँच करण्यात आला होता. लाँचिंग वेळी या स्मार्टफोनची किंमत 51,990 रुपये होती. त्यानंतर या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्यात आली होती. त्यानंतर हा स्मार्टफोन 49,900 रुपये किंमतीला उपलब्ध होता.

त्यानंतर आता पुन्हा एकदा या स्मार्टफोनच्या किंमतीत भरघोस कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा स्मार्टफोन 39,990 रुपयांना उपलब्ध आहे. ऑनलॉईन शॉपिंग वेबसाईट अमेझॉनवरुन तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करु शकता.

दरम्यान, कंपनीच्या वेबसाईटवर याची किंमत 41,990 रुपये एवढी आहे. या स्मार्टफोनची मोठी खासियत म्हणजे यामध्ये तीन रिअर कॅमेरे आहेत.

एक्सपीरिया एक्स झेड स्मार्टफोनचे फीचर्स (Sony Xperia XZ):
5.2 इंच फूल एचडी डिस्प्ले आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 4

स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर आणि 3 जीबी रॅम देण्यात आली आहे.

64 जीबी इंटरनल मेमरी

ड्यूल सिम आणि 4जी व्हीओएलटीई

23 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 13 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा

बॅटरी 2900 mAh क्षमता

दरम्यान, सोनीनं किंमतीत दिलेली ही सूट कायमस्वरुपी असणार आहे की, तात्पुरती याबाबत कपंनीनं काहीही स्पष्ट केलेलं नाही.

First Published:

Related Stories

दंगली भडकवणाऱ्यांची ओळख पटवण्यात पोलिसांपेक्षा ट्विटर फास्ट
दंगली भडकवणाऱ्यांची ओळख पटवण्यात पोलिसांपेक्षा ट्विटर फास्ट

नवी दिल्ली/ लंडन : सध्याच्या टेक्नोसॅव्ही युगात ट्विटरसह विविध सोशल

युरोपियन युनियनकडून गुगलला तब्बल 17 हजार 400 कोटींचा दंड
युरोपियन युनियनकडून गुगलला तब्बल 17 हजार 400 कोटींचा दंड

मुंबई: युरोपियन युनियननं गुगल या जगातल्या सर्वात मोठ्या सर्च

GSTनतंर मोबाईल बिल आणि रिचार्ज व्हाऊचरमध्ये मोठे बदल!
GSTनतंर मोबाईल बिल आणि रिचार्ज व्हाऊचरमध्ये मोठे बदल!

मुंबई: देशात 1 जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे. आतापर्यंतच्या कर

फोर्डने तब्बल 39,315 कार परत मागवल्या
फोर्डने तब्बल 39,315 कार परत मागवल्या

मुंबई: फोर्ड इंडियानं स्टेअरिंग पॉवर होजमध्ये बिघाड असलेल्या 39,315

सॅमसंगच्या सर्वात महागड्या स्मार्टफोनचे फीचर्स लीक
सॅमसंगच्या सर्वात महागड्या स्मार्टफोनचे फीचर्स लीक

मुंबई: सॅमसंग लवकरच आपल्या Note सीरीजमधील नवा स्मार्टफोन लाँच

कोहलीची सलमानवर मात, फेसबुकवर दुसऱ्या स्थानी विराजमान!
कोहलीची सलमानवर मात, फेसबुकवर दुसऱ्या स्थानी विराजमान!

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून प्रशिक्षकासोबतच्या वादामुळे

6 जीबी रॅम, 4000 mAh बॅटरी, ऑनर 8 प्रो स्मार्टफोन भारतात लाँच
6 जीबी रॅम, 4000 mAh बॅटरी, ऑनर 8 प्रो स्मार्टफोन भारतात लाँच

मुंबई: हुआवेनं आपला नवा स्मार्टफोन ऑनर 8 प्रो लाँच केला आहे. हा

एअरटेलची नवी मान्सून ऑफर, ग्राहकांना मिळणार मोफत 4जी डेटा
एअरटेलची नवी मान्सून ऑफर, ग्राहकांना मिळणार मोफत 4जी डेटा

मुंबई : रिलायन्स जिओनं टेलिकॉम क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर

6GB RAM, 4000mAh बॅटरी, 'हुआवे'चा नवा स्मार्टफोन लाँच
6GB RAM, 4000mAh बॅटरी, 'हुआवे'चा नवा स्मार्टफोन लाँच

नवी दिल्ली : हुआवेने ऑनर ब्रँडचा ‘ऑनर 8 प्रो’ हा स्मार्टफोन