जिओ फीचर फोनसाठी बुकींग पुन्हा सुरु होणार!

रिलायन्स जिओ फीचर फोनच्या दुसऱ्या फेजची प्री-बुकींग दिवाळीनंतर सुरु होणार आहे.

जिओ फीचर फोनसाठी बुकींग पुन्हा सुरु होणार!

मुंबई : रिलायन्स जिओचा फीचर फोन खरेदी करण्याची पुन्हा एकदा संधी ग्राहकांना मिळणार आहे. या फोनच्या दुसऱ्या फेजची प्री-बुकींग दिवाळीनंतर सुरु होणार आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार,  दिवाळीनंतर पुन्हा एकदा जिओफोनची प्री बुकींग वेबसाइट किंवा जवळच्या जिओ स्टोअरमध्ये करता येणार आहे.

या फेजमध्ये नोंदणी करण्यात आलेले फोन नोव्हेंबर महिन्यापर्यंत ग्राहकांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, पहिल्या फेजमध्ये कंपनीला मोठ्या प्रमाणात बुकींग मिळालं होतं. त्याचंच शिपिंग सध्या सुरु आहे. दरम्यान, प्री-बुकींगबाबत कंपनीनं कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही.

24 ऑगस्टला जिओफोनच्या पहिल्या फेजमधील बुकींग सुरु झालं होतं. ज्यामध्ये पहिल्या तीन दिवशीच लाखो लोकांनी प्री-बुकींग केलं होतं.

जिओच्या फीचर फोनची किंमत ही शून्य रुपये आहे. पण या फोनसाठी 1500 रुपये अनामत रक्कम द्यावी लागणार आहे. जी नंतर तुम्हाला परत केली जाणार आहे.

जिओफोन सिंगल सिम फोन आहे. ज्यामध्ये फक्त जिओ सिम सपोर्ट करेल. या फोनमध्ये 2.4 इंचीचं क्यूव्हीजीए डिस्प्ले देण्यात आलं आहे. तसेच यात न्यूमेरिक कीबोर्डही आहे. व्हॉईस कमांडनं या फोनमध्ये मेसेज, कॉल आणि गुगल सर्च करता येणर आहे. तसेच या फोनमध्ये मायक्रो एसडी कार्डही देण्यात आलं आहे. तसेच या फोनमध्ये बेसिक कॅमेराही देण्यात आला आहे.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV