IMEI नंबरशी छेडछाड केल्यास आता तीन वर्षांचा तुरुंगवास

मोबाईल चोरीच्या घटना रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे. आयएमईआय हा मोबाईलची ओळख असणारा 15 अंकी नंबर असतो.

IMEI नंबरशी छेडछाड केल्यास आता तीन वर्षांचा तुरुंगवास

नवी दिल्ली : मोबाईलच्या आयएमईआय (आंतरराष्ट्रीय मोबाईल उपकरण ओळख) नंबरशी छेडछाड करणं आता दंडनीय गुन्हा ठरणार आहे. यामध्ये तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवासही होऊ शकतो. मोबाईल चोरीच्या घटना रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे. आयएमईआय हा मोबाईलची ओळख असणारा 15 अंकी नंबर असतो.

दूरसंचार विभागाने 25 ऑगस्ट रोजी याबाबत अधिसूचना जारी केली होती. यामुळे आयएमईआय संबंधित समस्यांवर तोडगा काढणं आणि हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी शक्य होणं अपेक्षित आहे. आयएमईआय नंबरशी छेडछाड करणं हा गुन्हा असल्याचं अधिसूचनेमध्ये म्हटलं आहे.

इंडियन टेलीग्राफच्या कलम 7 आणि कलम 25 अन्वये यासाठी एक नवीन नियमही तयार करण्यात आला आहे. शिवाय कोणत्याही नेटवर्कचा मोबाईल चोरी झाला किंवा हरवला तर त्यावरील सेवा बंद करण्यासाठी दूरसंचार विभाग एक नवीन प्रणाली लागू करणार आहे. आयएमईआय नंबर बदलला किंवा सिम काढल्यानंतरही या प्रणालीमुळे इतरांना मोबाईल वापरता येणार नाही.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: IMEI mobile आयएमईआय मोबाईल
First Published:
LiveTV