टाटाची नेक्सन कार लाँच, किंमत 5.85 लाख

टाटा नेक्सनमध्ये एक्सई, एक्सएम, एक्सटी आणि एक्सझेड प्लस हे व्हेरिएंट उपलब्ध आहेत.

टाटाची नेक्सन कार लाँच, किंमत 5.85 लाख

 

मुंबई : टाटा मोटर्सनं आपली नवी कार 'नेक्सन' नुकतीच लाँच केली आहे. या कारच्या बेसिक मॉडेलची किंमत 5.85 लाख रुपये (एक्स शोरुम) आहे. या कारची स्पर्धा सुझुकीच्या ब्रिझा कारशी असणार आहे.

व्हेरिएंट आणि किंमत (एक्स-शोरूम)
व्हेरिएंट किंमत (पेट्रोल) किंमत (डिझेल)
एक्सई 5.85 लाख रुपये 6.85 लाख रुपये
एक्सएम 6.49 लाख रुपये 7.39 लाख रुपये
एक्सटी 7.29 लाख रुपये 8.14 लाख रुपये
एक्सजेड प्लस 8.44 लाख रुपये 9.29 लाख रुपये
एक्सजेड प्लस (ड्यूल-टोन) 8.59 लाख रुपये 9.44 लाख रुपये

 

(ही कारची एक्स शोरुम किंमत असून प्रत्येक शहरात कारची किंमत वेगवेगळी असू शकते.)

tata 1

टाटा नेक्सनमध्ये एक्सई, एक्सएम, एक्सटी आणि एक्सझेड प्लस हे व्हेरिएंट उपलब्ध आहेत. ड्यूल एअरबॅग, एबीएस आणि ईबीडी यासारखे सेफ्टी फीचर सर्व व्हेरिएंटमध्ये देण्यात आले आहेत. तसेच यामध्ये 6.5 इंच टचस्क्रिन इंफोटेन्मेंट सिस्टम, मल्टिपल ड्रायव्हिंग मोड यासारखे अनेक नवीन फीचर देण्यात आले आहेत.

tata 2

या कारमध्ये पेट्रोल आणि डिझेल हे दोन्ही व्हेरिएंट आहेत. पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 1.2 लीटर इंजिन आहे जे 110 पीएस पॉवर आणि 170 एनएम टॉर्क देतं. डिझेल व्हेरिएंटमध्ये 1.5 लीटर इंजिन आहे. जे 110 पीएस आणि टॉर्क 260 एनएम आहे. दोन्हीमध्ये 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

बातमी सौजन्य : cardekho.com 

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV