2020पर्यंत टोयोटा 10 इलेक्ट्रिक कार लाँच करणार

कार कंपनी टोयोटानं नुकतीच एक नवी घोषणा केली आहे. 2020 पर्यंत 10 इलेक्ट्रिक कार आणण्याचा आपला मानस असल्याचं टोयोटानं व्यक्त केला आहे. या कार भारताशिवाय चीन, जपान, अमेरिका आणि युरोपात लाँच करण्यात येणार आहे.

2020पर्यंत टोयोटा 10 इलेक्ट्रिक कार लाँच करणार

मुंबई : कार कंपनी टोयोटानं नुकतीच एक नवी घोषणा केली आहे. 2020 पर्यंत 10 इलेक्ट्रिक कार आणण्याचा आपला मानस असल्याचं टोयोटानं व्यक्त केला आहे. या कार भारताशिवाय चीन, जपान, अमेरिका आणि युरोपात लाँच करण्यात येणार आहे.

कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक कार भारतात लाँच करण्याआधी चीनमध्ये लाँच करण्यात येतील. कारण की, चीन जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनींची बाजारपेठ आहे.

toyota electric car 2

टोयोटा सुरुवातीला भारतात एक छोटी इलेक्ट्रिक कार लाँच करु शकते. ही कार मारुती सुझुकीच्या गुजरातमधील प्लांटमध्ये तयार करण्यात येईल. कारण की, भारतात इलेक्ट्रॉनिक कार तयार करण्यासाठी मारुती सुझुकी आणि टोयोटानं नुकतीच हातमिळवणी केली आहे.

इलेक्ट्रॉनिक कार रस्त्यावर धावू लागल्यास प्रदूषणाची मोठी समस्या सुटू शकते. यामुळे लवकरात लवकर इलेक्ट्रॉनिक कार बाजारात आणण्याचा प्रयत्न टोयोटा करेल.

बातमी सौजन्य : cardekho.com

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Toyota will launch 10 electric cars by 2020 latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV