टोयोटाच्या कारवर हजारो रुपयांची सूट, नवी ऑफर लाँच

टाटा, रेनॉल्ट आणि ह्युदांई पाठोपाठ आता टोयोटानं देखील डिस्काउंट ऑफर आणली आहे.

टोयोटाच्या कारवर हजारो रुपयांची सूट, नवी ऑफर लाँच

मुंबई : टाटा, रेनॉल्ट आणि ह्युदांई पाठोपाठ आता टोयोटानं देखील डिस्काउंट ऑफर आणली आहे. डिसेंबर महिन्यात आपला खप वाढवण्यासाठी टोयोटानं 'रिमेंबर डिसेंबर' ही ऑफर लाँच केली आहे. ही ऑफर 31 डिसेंबरपर्यंत असणार आहे. यामध्ये ऑफरमध्ये कॅमरी, प्रियस आणि एलसी रेंज सोडता सर्व कारवर ऑफर असणार आहे.

पाहा टोयोटाच्या कोणत्या कार किती सूट :

टोयोटा इटियॉस रेंज

प्लॅटिनम इटियॉस : मागील वर्षी लाँच झालेली फेसलिफ्ट प्लॅटिनम इटियॉसवर 50,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे.

इटियॉस लिवा : सप्टेंबर 2016 मध्ये लाँच झालेली अपडेट इटियॉस लिवा कारवर 30,000 रुपयांची सूट आहे.

इटियॉस क्रॉस : या कारवर तब्बल 40,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे.

टोयोटा कोरोला 

टोयोटानं मार्च 2017 मध्ये कोरोला फेसलिफ्ट कार लाँच करण्यात आली होती. याच्या अपडेट मॉडेलवर तब्बल 60,000 सूट देण्यात आली असून सरकारी कर्मचाऱ्यांना 40,000 हजार अतिरिक्त सूट देण्यात आली आहे.

टोयोटा फॉर्च्युनर आणि इनोव्हा क्रिस्टा 

फॉर्च्युनर आणि इनोव्हा क्रिस्टा या टोयोटाच्या सर्वात जास्त खप असणाऱ्या कार आहेत. या कारला मागणी असल्यानं त्या वेटिंग पीरियडवर आहेत. हाच वेटिंग पीरियड कमी करण्यासाठी कंपनीनं या कारचं उत्पादन अधिक वाढवलं आहे. डिसेंबरच्या या ऑफरमध्ये या दोन्ही कारवर टोयोटा फायनॅन्शियल सर्विसकडून आकर्षक व्याज दरावर कर्ज देण्यात येणार आहे.

बातमी सौजन्य : cardekho.com 

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Toyota’s discount offer on fortuner innova and other cars latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV