आता बिनधास्त लिहा, ट्विटरने अक्षर मर्यादा वाढवली

ट्विटरवर आधी 140 अक्षरांची मर्यादा होती. मात्र आता ती दुप्पट म्हणजेच 280 अक्षरांची करण्यात आली आहे.

आता बिनधास्त लिहा, ट्विटरने अक्षर मर्यादा वाढवली

मुंबई : ट्विटरने अक्षरमर्यादेत दुपटीने वाढ केली आहे. ट्विटरवर आधी 140 अक्षरांची मर्यादा होती. मात्र आता ती दुप्पट म्हणजेच 280 अक्षरांची करण्यात आली आहे. त्यामुळे ट्वीट करताना आता तुम्हाला लिहिण्यात काटकसर करण्याची गरज नाही.

चायनिज, जॅपनिज आणि कोरियन भाषेत ट्वीट करणाऱ्यांना मात्र आधीचीच अक्षरमर्यादा असेल. 90 टक्के ट्विट्स हे इंग्लिशमधून केले जातात, तिथे 140 ची अक्षरमर्यादा कमी पडते आणि यूजर्सचा अधिक वेळ ट्विट एडिट करण्यातच जातो, असं स्पष्टीकरण ट्विटरकडून देण्यात आलं आहे.

मराठी भाषेत ट्वीट करण्यासाठीही याचा फायदा होणार आहे. कारण मराठी भाषेत ट्वीट करताना काना, मात्रा, उकार मोजले जातात. त्यामुळे अक्षर मर्यादा लवकर संपत होती. पण आता अक्षर मर्यादा वाढवण्यात आल्यामुळे ट्वीट एडिट करत बसण्यात वेळ जाणार नाही.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Twitter extended character limit
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV