UC ब्राऊजर गुगल प्ले स्टोअरवरुन रातोरात गायब

गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप आतापर्यंत 50 कोटी ग्राहकांनी डाऊनलोड केलं आहे.

UC ब्राऊजर गुगल प्ले स्टोअरवरुन रातोरात गायब

मुंबई : गुगल प्ले स्टोअरवरुन यूसी ब्राऊजर कथितस्वरुपात हटवण्यात आलं आहे. गुगलने हे भारतातील सर्वात लोकप्रिय ब्राऊजर हटवलं आहे. भारतात सर्वाधिक डाऊनलोड केलं जाणारं हे सहावं अॅप आहे. गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप आतापर्यंत 50 कोटी ग्राहकांनी डाऊनलोड केलं आहे.

चीनची प्रसिद्ध कंपनी अलीबाबा ग्रुपचं हे अॅप आहे. या अॅपचं मिनी व्हर्जन अजून प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. हे अॅप का हटवण्यात आलं, याबाबत अद्याप गुगल किंवा अलीबाबा कंपनीने काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

याबाबत यूसी ब्राऊजरमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने माहिती दिली आहे. ब्राऊजर 30 दिवसांसाठी हटवण्यात आलं आहे. चुकीच्या पद्धतीने प्रमोशन करुन डाऊनलोड वाढवल्यामुळे गुगलने ही कारवाई केली, अशी माहिती या कर्मचाऱ्याने दिली आहे.

दरम्यान भारतीय ग्राहकांचा डेटा चीनच्या सर्व्हरला विकल्याचा आरोपही यूसी ब्राऊजरवर लावण्यात आला होता. यावर्षी ऑगस्टमध्ये सरकारने या ब्राऊजरची चौकशीही सुरु केली होती.

संबंधित बातमी : UC ब्राऊजरवर चीनला भारतीय ग्राहकांचा डेटा विकल्याचा आरोप

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: uc-browser-disappears from google play store
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV