सॅमसंग सेल : गॅलक्सी S7 वर तब्बल 25 हजार रुपयांची सूट!

फ्लिपकार्टवर सध्या तीन दिवसीय सॅमसंग फेस्ट चालू असून आज याचा अखेरचा दिवस आहे. सॅमसंगच्या विविध फोन्सवर यामध्ये भरघोस सूट देण्यात आली आहे.

सॅमसंग सेल : गॅलक्सी S7 वर तब्बल 25 हजार रुपयांची सूट!

मुंबई : फ्लिपकार्टवर सध्या तीन दिवसीय सॅमसंग फेस्ट चालू असून आज याचा अखेरचा दिवस आहे. सॅमसंगच्या विविध फोन्सवर यामध्ये भरघोस सूट देण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅलक्सी एस 7 तुम्ही केवळ 29 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करु शकता.

फ्लिपकार्टवर या फोनची एकूण किंमत 46 हजार रुपये आहे. म्हणजेच तुम्हाला 16 हजार 10 रुपये किंमतीवर सूट मिळेल. शिवाय एक्स्चेंज ऑफरमुळे हा लोकप्रिय फोन तुम्हाला आणखी स्वस्त किंमतीत खरेदी करता येईल. 149 रुपयांमध्ये बायबॅक गॅरंटीही खरेदी करता येईल.

सॅमसंग गॅलक्सी ऑन मॅक्सवर 2 हजार रुपयांची सूट आहे. हा फोन तुम्हाला 14 हजार 900 रुपयात खरेदी करता येईल. याशिवाय 14 हजार रुपयांची एक्स्चेंज ऑफरही देण्यात आली आहे. गॅलक्सी ऑन 5 वर 2500 रुपये सूट आहे. 6 हजार 490 रुपयांमध्ये हा फोन खरेदी करता येईल.

फोन आणि सूट

  • गॅलक्सी ऑन 7- सूट 1500 रुपये, किंमत- 6990

  • गॅलक्सी ऑन नेक्स्ट- सूट 4000 रुपये, किंमत – 13 हजार 900 रुपये

  • गॅलक्सी सी 9 प्रो – सूट 4100 रुपये, किंमत – 29 हजार 900

  • गॅलक्सी जे 7- सूट 4100 रुपये, किंमत - 9790 रुपये

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: up to 25000 discount on Samsung galaxy s7
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: samsung fest सॅमसंग फेस्ट
First Published:
LiveTV