आता व्हॉट्सअॅपवरुन मेसेजसोबत पैसेही पाठवा, पेमेंट फीचर लाँच

अँड्रॉईड आणि आयओएस फोनच्या बीटा व्हर्जनमध्ये हे फीचर सध्या काम करत आहे.

आता व्हॉट्सअॅपवरुन मेसेजसोबत पैसेही पाठवा, पेमेंट फीचर लाँच

मुंबई : व्हॉट्सअॅप आता केवळ मेसेजवर बोलण्यापर्यंतच मर्यादित राहिलेलं नाही. कंपनीने ग्राहकांना यूपीआय पेमेंटचा ऑप्शन दिला आहे. अँड्रॉईड आणि आयओएस फोनच्या बीटा व्हर्जनमध्ये (बीटा व्हर्जन - कंपनीतील असे काही युझर्स ज्यांना हे फीचर चाचणी करण्यासाठी वापरायला दिलेलं आहे) हे फीचर सध्या काम करत आहे. लवकरच सर्व फोनमध्ये हे फीचर येईल.

Gizmotimes च्या वृत्तानुसार, हा नवा पेमेंट ऑप्शन अटॅचमेंट ऑप्शनमध्येच आहे. फोटो, ऑडिओ, व्हिडीओ या सर्व पर्यायांसोबतच तुम्हाला आता पेमेंट ऑप्शन दिसणार आहे. हे नवं फीचर अँड्रॉयड 2.18.21 व्हर्जन आणि आयओएसच्या 2.18.41 व्हर्जनमध्ये दिलं जाण्याची शक्यता आहे.

whats app payment

पेमेंट फीचर काम कसं करतं?

पेमेंट फीचर पाहण्यासाठी तुम्हाला अटॅचमेंट ऑप्शनमध्ये जावं लागेल, जिथे ऑडिओ, कॉन्टॅक्ट, व्हिडीओ असे ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत. पेमेंटवर क्लिक करताच तुम्ही यूपीआय पेजशी जोडले जाल. तुमचं यूपीआय अकाऊंट नसेल तर ते तुम्ही यूपीआय अॅप किंवा बँकेच्या अॅपवर जाऊन तयार करु शकता. हे फीचर सध्या काही निवडक बीटा युझर्सनाच देण्यात आलेलं आहे.

यूपीआय पेमेंट म्हणजे काय?

यूनिफाईड पेमेंट इंटरफेज म्हणजे यूपीआय हा एक असा पर्याय आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही देशातील कोणत्याही व्यक्तीला अगदी सोप्या पद्धतीने पैसे पाठवू शकता. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला तुमच्या बँक खात्याचा क्रमांक माहित असणं गरजेचं नाही. केवळ अकाऊंटशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरुनही तुम्ही पैसे पाठवू शकता. बँकांना या पेमेंटची परवानगी एनपीसीआय म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑप इंडियाने दिलेली आहे. ज्यामुळे प्रत्येक बँक NEFT, IMPS यांसोबतच यूपीआयचाही पर्याय देते.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Whats app testing UPI payemt
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV